मुंबई : राज्यात कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर संचारबंदीची घोषणा करण्यात आली आहे. त्यातच नागरिकांना राज्यात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी पासची गरज आहे की नाही? असा प्रश्न पडला आहे. याचं उत्तर राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी दिलं आहे. राज्यात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी पासची गरज नाही. पण पोलिसांनी याबाबत विचारणा केली तर कारण सांगावं लागणार आहे, असं पोलिस महासंचालक संजय पांडे म्हणाले.
वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलल्या https://t.co/Utbk7Zt2H8
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 15, 2021
राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबत आज पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की, राज्यात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी पासची गरज नाही. मात्र जर पोलिसांनी याबाबत विचारणा केली तर कारण मात्र सांगावं लागणार आहे.
महाराष्ट्रात कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत असून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतानाच दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यांत 15 दिवसांसाठी संचारबंदीची घोषणा केली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
बुधवारी म्हणजेच, आज रात्री 8 वाजल्यापासून राज्यात 144 कलम लागू करण्यात येणार असून पुढील 15 दिवसांसाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याला ‘ब्रेक द चेन’ असं नाव देण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील नागरिकांना अनेक महत्वाचे प्रश्न पडले आहेत. यात सर्वात महत्वाचं म्हणजे राज्यात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी पासची गरज आहे की नाही? तर या प्रश्नाचं उत्तर ‘नाही’ असं आहे.
'मला चंपा म्हणणं थांबले नाही तर…' चंद्रकांत पाटलांचा पवारांना इशारा https://t.co/Qub40hHEzc
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 15, 2021
पांडे यांनी सांगितलं की, आपत्कालीन कामासाठी जर कुणी बाहेर पडलं असेल तर त्यांना विनाकारण पोलिसांकडून त्रास दिला जाणार नाही. जनहितासाठी सरकारनं लॉकडाऊनसारखं पाऊल उचललं आहे, असं पांडे यांनी सांगितलं. त्यांनी म्हटलं की, वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळं आरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढला आहे.