मुंबई : IPL 2021 मध्ये राजस्थान रॉयल्सनं दिल्लीचा 3 विकेट्सनी पराभव केला. दिल्ली कॅपिटल्सनं प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 8 बाद 147 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात राजस्थाननं हे आव्हान 19.4 षटकात पूर्ण केलं. दिल्लीकडून रिषभ पंतनं सर्वाधिक 51 धावा केल्या. तसेच, राजस्थानकडून डेव्हिड मिलरनं सर्वाधिक 62 धावा केल्या. तर, ख्रिस मॉरिसनं 4 गगनचुंबी षटकारांच्या साहाय्यानं झटपट 36 धावांची खेळी केली.
https://twitter.com/IPL/status/1382744625903931392?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1382744625903931392%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fd-8497879974208321402.ampproject.net%2F2104022034000%2Fframe.html
आयपीएल 2021 स्पर्धेत मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर दिल्ली कॅपिट्ल्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांमध्ये खेळवण्यात आला. दिल्लीने विजयासाठी राजस्थानला 148 धावांचे आव्हान दिले होते. दिल्लीकडून कर्णधार रिषभ पंतने सर्वाधिक 51 धावांची खेळी केली होती. त्यानंतर मैदानात आलेल्या राजस्थानच्या फलंदाजांनी दिल्लीने दिलेलं आव्हान अखेरच्या षटकात पूर्ण केलं.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1382720078198628359?s=19
ख्रिस मॉरीसने अखेरच्या दोन षटकात केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर राजस्थानने या स्पर्धेतील पहिला सामना जिंकला आहे. राजस्थानकडून विस्फोटक फलंदाज डेव्हिड मिलरने 62 धावांची खेळी केली. त्यानंतर ख्रिस मॉरीसने 18 चेंडूत 36 धावा फटकावत सामन्यात राजस्थानला विजय मिळवून दिला. दरम्यान, दिल्लीच्या गोलंदाजांनी आज टिच्चून गोलंदाजी केली होती. दिल्लीकडून आवेश खानने 3. कगिसो रबाडाने 2 आणि ख्रिस वोक्सने 2 विकेट्स घेतल्या.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कर्णधार आणि विकेटकीपर रिषभ पंतने सामन्यातील 18 व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर जयदेव उनाडकटला जीवनदान दिलं. पहिल्या चेंडूवर ख्रिस मॉरीसने फटका मारला. दोघांनी एक धावा पूर्ण केली. मात्र त्यानंतर दुसऱ्या धावेसाठी उनाडकट आग्रही होता. पण मॉरीसने त्याला परत पाठवले. यावेळेस उनाडकट मैदानात घसरला. पंतला रनआऊट करण्याची नामी संधी होती. मात्र चेंडू हातातून घसरल्याने उनाडकटला जीवनदान मिळाले.
https://twitter.com/IPL/status/1382657592963461121?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1382657592963461121%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fd-8497879974208321402.ampproject.net%2F2104022034000%2Fframe.html
राजस्थानने सहावी विकेट गमावली. राहुल तेवतियाने 19 धावांची खेळी केली. तेवतिया आणि डेव्हिड मिलरमध्ये सहाव्या विकेटसाठी चांगली भागीदारी झाली होती. मात्र ही जोडी कगिसो रबाडाने मोडीत काढली. दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतने शानदार अर्धशतक पूर्ण केलं आहे. पंतने अवघ्या 30 चेंडूत अर्धशतक झळकावलं आहे. दिल्ली अडचणीत असताना रिषभने निर्णायक क्षणी अर्धशतक लगावत दिल्लीचा डाव सावरला.