Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: लग्नाचे आमीष दाखवून ऑर्केस्ट्रामधील नृत्यांगनेवर बलात्कार, गर्भपात
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

लग्नाचे आमीष दाखवून ऑर्केस्ट्रामधील नृत्यांगनेवर बलात्कार, गर्भपात

Surajya Digital
Last updated: 2021/04/17 at 8:53 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर : सोलापुरात लग्नाचे आमिष दाखवून ऑर्केस्ट्रामधील 23 वर्षीय नृत्यांगनेवर दीड वर्षापासून बलात्कार केल्याप्रकरणी रिक्षा चालक आकाश ओव्हाळ (रा. बाळे, सोलापूर) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आर्केस्ट्रामधील पीडित नृत्यांगना ही शहरातील शिवाजीनगर परिसरात राहते.

रेल्वेचा निर्णय ! विनामास्क फिरणाऱ्यांकडून 500 रुपये दंड https://t.co/CIEkBM3yW0

— Surajya Digital (@SurajyaDigital) April 17, 2021

मार्केटमध्ये ये-जा करताना 2020 मध्ये तिची रिक्षाचालक आकाश याच्याशी ओळख झाली. दोघांनी एकमेकांना मोबाईल क्रमांक दिले. जानेवारी 2020 मध्ये संबंधित नृत्यांगनेची तब्येत ठिक नसल्याची माहिती त्यांनी आकाश याला दिली. यावेळी आकाश याने मेडिकलमधून गोळी आणि जेवण घेऊन येतो असे सांगितले. पुन्हा आकाश नृत्यांगना राहत असलेल्या रूमवर गेला. त्याने तिला जेवण आणि गोळी दिली. त्यानंतर त्याने ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे, तू मला आवडतेस’ असे सांगितले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

यावेळी पीडित नृत्यांगणेने ‘काहीतरी बोलू नकोस’ म्हणत फटकारले. त्यामुळे आकाश तेथून निघून गेला. पुन्हा दोन दिवसांनी त्याने तिला फोन करून आपण मित्र – मैत्रिण सारखे राहू असे म्हटले. त्यानंतर तिला सोबत जेवायला येण्याची विनंती केली. ते दोघे जेवायला गेल्यानंतर त्याने पुन्हा ‘मी तुझ्याबरोबर लग्न करणार असून तुला धोका देणार नाही’ असे सांगितले.

* दोनदा गेले दिवस, केला गर्भपात

मार्च 2020 मध्ये आकाश हा पीडित नृत्यांगणेच्या रूमवर गेला. त्याने तिला पुन्हा विवाहाचे आमिष दाखवत तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर आकाश हा नेहमी रूमवर जावून लग्नाचे अमिष दाखवून शरीर संबंध ठेवत होता. अखेर ऑक्टोबर 2020 मध्ये नृत्यंगणेला आकाशपासून दिवस गेले. ही बाब तिने आकाशला सांगितल्यानंतर त्याने विवाहाअगोदर अपत्य नको असा पवित्रा घेतला. तसेच पोट दुखी कमी होण्याची गोळी असल्याचे सांगून मेडिकलमधून गर्भनिरोधक गोळी आणून दिली.

https://twitter.com/SurajyaDigital/status/1383374423437189126?s=19

त्यानंतर पुन्हा त्याने तिच्याशी संबंध कायम ठेवले. यातून 6 एप्रिल 2021 रोजी पुन्हा तिला दिवस गेल्याची बाब तिने आकाशला सांगितली. त्यावेळी पुन्हा आकाश याने पुन्हा मेडिकलमधून गर्भनिरोधक गोळी आणून दिली. त्यानंतर त्याने दुसर्‍या महिलेबरोबर फोनवरून नृत्यगनेशी बोलणे करून दिले. अखेर आकाश हा तिला फसवत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे तिने त्याच्याविरुद्ध विवाहाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याबद्दल पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार आकाशवर गुन्हा दाखल झाला.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Rape #orchestra #dancer #lure #marriage, #लग्नाचे #आमीष #ऑर्केस्ट्रामधील #नृत्यांगनेवर #बलात्कार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article रेल्वेचा निर्णय ! विनामास्क फिरणाऱ्यांकडून 500 रुपये दंड
Next Article आयपीएलवर सट्टा लावणारी टोळी मुंबई पोलिसांच्या जाळ्यात

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?