Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अमिताभ यांनी व्यक्त केले ब्लॉगवर अनुभव; माझ्याजवळ कोणीच येत नाही, कोरोना उपचाराला झाले 15 दिवस
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
टॉलीवुड

अमिताभ यांनी व्यक्त केले ब्लॉगवर अनुभव; माझ्याजवळ कोणीच येत नाही, कोरोना उपचाराला झाले 15 दिवस

Surajya Digital
Last updated: 2020/07/27 at 1:58 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

मुंबई : रात्री अंधाऱ्या आणि हुडहुडी भरेल अशा थंड खोलीत मी गाणं गातो. झोपण्यासाठी डोळे बंद करण्याचा प्रयत्न करतो. आजूबाजूला कुणीच नसतं, कोरोना पॉझिटिव्ह अभिनेते अमिताभ बच्चन यांचे हे शब्द. अमिताभ रुग्णालयात उपचार घेत आहेत याला 15 दिवस झालेत. मुंबईतीलनानावटी रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अभिनेते अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्यावर 11 जुलैपासून मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन यांना 17 जुलैला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अजून त्यांना किती दिवस रुग्णालयात राहावं लागेल याबाबत बच्चन कुटुंबाकडून काही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र अमिताभ सातत्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या आरोग्याबाबत माहिती देत आहेत आणि चाहत्यांशी संवाद साधत आहेत.

(तुमचे हक्काचे ‘सुराज्य डिजिटल‘ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि टेलिग्रामवरही https://t.me/Surajyadigital उपलब्ध)

या पंधरा दिवसात त्यांच्यावर कसे उपचार होत आहेत, कोरोनाशी लढा देताना त्यांना कोणत्या परिस्थितीतून जावं लागतं आहे, याबाबत अमिताभ व्यक्त झाले आहेत. आपल्या ब्लॉगमार्फत त्यांनी हा संपूर्ण अनुभव मांडला आहे.

अमिताभ म्हणाले, “उपचारादरम्यान आठवडाभर रुग्णाला दुसरा माणूसच दिसत नाही. मेडिसीन केअरसाठी नर्स आणि डॉक्टर्स येतात मात्र ते पीपीई सूटमध्ये असतात. ते कोण आहेत हे तुम्हाला समजत नाही. त्यांचे हावभाव तुम्हाला दिसत नाहीत. त्यांची उपस्थिती रोबोटिक असते. ते आपलं काम करतात आणि निघून जातात. जास्त वेळ थांबल्याने त्यांनाही संक्रमणची भीती असते. ज्या डॉक्टराच्या निगरानीत कोविड रुग्णावर उपचार होतात. ते डॉक्टर कधीच त्याच रुग्णाच्या जवळ येत नाहीत किंवा त्याला कसलं आश्वासन देत नाही. व्हिडीओमार्फत ते संवाद साधतात. सध्याची परिस्थिती पाहता हे योग्यदेखील आहे”

“मात्र याचा मानसिक परिणाम होतो का? मानसशास्त्रज्ञ सांगतात हो होतो. डिस्चार्ज मिळाल्यानंतर रुग्णाला राग येतो. ते बाहेर जायला घाबरू लागतात. आपल्याला वेगळी वागणूक दिली जाईल याची भीती त्यांच्या मनात असते, जसं काय ते आजाराला आपल्यासोबत घेऊन जात असतात. हा एक पॅरिया सिंड्रोम आहे. जो त्यांना अशा डिप्रेशन आणि एकटेपणात घेऊन जातो”, असं अमिताभ आपल्या ब्लॉगवर व्यक्त झाले आहेत.

visit us : www.surajyadigital.com

You Might Also Like

तमिळ अभिनेते माधन बॉब यांचे निधन

35 वर्षांनी मोठ्या पडद्यावर दिसणार ; ‘मैने प्यार किया’ पुन्हा रिलीज होणार

श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा तीव्र झटका; बॉबी देओलने केला खुलासा

राष्ट्रपतींच्या हस्ते सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार अल्लू अर्जुनला, अलियाने पटकावले पाच पुरस्कार 

बॉलीवूड कलाकार ईडीच्या रडारावर, ईडीची 39 ठिकाणी छापेमारी

TAGGED: #अमिताभबच्चन #कोरोनाउपचार #ब्लॉग #व्यक्त
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सरकारने वेळ मागून घेतला; मराठा आरक्षणावरील सुनावणी परत पुढे ढकलली
Next Article सिमेवरील सैनिकांसाठी पुणेकरांनी पाठविले राखीचे ‘प्रेमबंधन’; दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात झाला कार्यक्रम

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?