Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सर्वसामान्य नागरिकांसाठी 48 तासांत केंद्र सरकारचे 5 मोठे निर्णय
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

सर्वसामान्य नागरिकांसाठी 48 तासांत केंद्र सरकारचे 5 मोठे निर्णय

Surajya Digital
Last updated: 2021/04/20 at 12:17 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

नवी दिल्ली : कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने गेल्या 48 तासांत 5 महत्वाचे निर्णय घेतले आहेत. 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण, ऑक्सिजनच्या औद्योगिक वापरावर बंदी, रेमडेसिव्हीरची किंमत कमी आणि उत्पादन वाढ, ऑक्सिजन एक्सप्रेस चालवण्याचा निर्णय, तात्पुरत्या रुग्णालयांची उभारणी असे पाच मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.

महाराष्ट्रात पुन्हा कडक लॉकडाऊनची शक्यता, आज मंत्रिमंडळाची बैठक #lockdown #सुराज्यडिजिटल #महाराष्ट्र #Maharashtra #Cabinet #meeting #surajyadigital pic.twitter.com/Xllr8BcWFY

— Surajya Digital (@SurajyaDigital) April 20, 2021

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूच्या प्रमाणातही झपाट्याने वाढ होत आहे. अशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने गेल्या 48 तासांत 5 महत्वाचे निर्णय घेतले आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यात रोज 2 लाखापेक्षा अधिक नवे रुग्ण सापडत आहेत. रुग्णांचा बेड मिळणं कठीण झालं आहे. तर ज्यांना बेड मिळतोय त्यांना ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हीर इंजेक्शनच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. या अडचणींवर मात करण्यासाठी केंद्रासह सर्वच राज्य सरकारांकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहे.

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रापाठोपाठ आता दिल्ली आणि राजस्थानमध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आलीय. छत्तीसगड आणि उत्तर प्रदेशातील काही शहरातही लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय. अनेक राज्यांमध्ये रात्रीची संचारबंदी आणि विकेंड लॉकडाऊनही लागू करण्यात आला आहे. अशावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने या दोन दिवसांत महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

'देवेंद्र फडणवीसांच्या पुतण्याला लस कशी मिळाली ?, व्हायरल पोस्ट लगेच केली डिलिट https://t.co/MA2il4WWVk

— Surajya Digital (@SurajyaDigital) April 20, 2021

* केंद्राने लसीचे वय घटवले

1 मे पासून 18 वर्षांवरील सर्व पात्र व्यक्तींना कोरोना लस दिली जाणार आहे. केंद्र सरकारने हा निर्णय घेतला.यापूर्वी सर्वात आधी 60 वर्षांवरील ज्येष्ठांना लस दिली जात होती. त्यानंतर 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस देण्यास सुरुवात झाली. त्यानंतर आता 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांना कोव्हिड 19 लस देण्यााच निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

* ऑक्सिजनच्या औद्योगिक वापरावर बंदी

कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असताना दुसरीकडे अनेक राज्यांत रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. अशावेळी केंद्राने रुग्णालयांमधील ऑक्सिजनचा पुरवठा वाढवला आहे. तसंच रुग्णालय परिसरातच ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारण्याचे प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. 22 एप्रिलपासून पुढील आदेशापर्यंत उद्योगांच्या ऑक्सिजन पुरवठ्यावरही बंदी घालण्यात आली आहे.

मोठा दिलासा; मोदी सरकारने Remdesivir केले स्वस्त https://t.co/vuXvPVTfCK

— Surajya Digital (@SurajyaDigital) April 17, 2021

* रेमडेसिव्हीरची किंमत कमी आणि उत्पादन वाढ

कोरोना रुग्णांवर उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या रेमडेसिव्हीर इंजेक्शनच्या किमतीत दोन दिवसांपूर्वी कपात करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर रेमडेसिव्हीरच्या मागणीतही वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये रेमडेसिव्हीरचा काळाबाजारही सुरु झाला होता. तो रोखण्यासाठी रेमडेसिव्हीरचं उत्पादन वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय.

कोरोनाविरोधात लढ्यासाठी आता 'ऑक्सिजन एक्स्प्रेस' धावणार https://t.co/iC5CN816js

— Surajya Digital (@SurajyaDigital) April 19, 2021

* ऑक्सिजन एक्सप्रेस चालवण्याचा निर्णय

अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. अशावेळी रेल्वे मंत्रालयाने लिक्विड मेडिकल ऑक्सिजन आणि ऑक्सिजन सिलिंडरचा देशाच्या विविध भागात पुरवठा करण्यासाठी ऑक्सिजन एक्सप्रेस चालवण्याचा निर्णय घेतलाय. या ऑक्सिजनच्या एक्सप्रेसच्या वाहतुकीदरम्यान कुठलाही अडथळा येऊ नये म्हणून ग्रीन कॉरिडॉर बनवला जात आहे.

शरद पवारांच्या नावाने दुसऱ्यांदा उभारलं 1 हजार बेडचं कोविड सेंटर https://t.co/nYMUCUhe5Q

— Surajya Digital (@SurajyaDigital) April 18, 2021

* तात्पुरत्या रुग्णालयांची उभारणी

केंद्र सरकारने आरोग्य विभागावरही लक्ष्य केंद्रित केलं आहे. कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे. मात्र, रुग्णांना बेड उपलब्ध होत नाहीत. बेडसाठी रुग्णांना वाट पाहावी लागतेय आणि त्यातच अनेकांचा जीव जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने तात्पुरत्या स्वरुपाची रुग्णालये उभारण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या मदतीने ही रुग्णालये उभारली जाणार आहेत. दिल्लीच्या कँट, लखनऊमध्ये डीआरडीओ आणि छतरपूरमध्ये सैन्याने अशाप्रकारच्या रुग्णालयांची उभारणी केली आहे.

इस्रायलने कोरोनावर केली मात, मास्कला केले बाय – बाय, कसे ते वाचा सविस्तर, https://t.co/v4fc4e4eMK

— Surajya Digital (@SurajyaDigital) April 19, 2021

You Might Also Like

पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा

न्यायाबरोबर निसर्गाचे रक्षण देखील सामाजिक जबाबदारी – सत्र न्यायाधीश अंजू शेंडे

इराणने मोसादशी संबंध असलेल्या तीन गुप्तहेरांना दिली फाशी, ७०० जणांना अटक

माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत ‘ब’ वर्गातुन उपमुख्यमंत्रील अजित पवार विजयी

विंग कमांडर अभिनंदन यांना पकडल्याचा दावा करणारा पाकिस्तानी मेजर टीटीपी हल्ल्यात ठार

TAGGED: #5bigdecisions #centralgovernment #48hours #ordinary #citizens, #सर्वसामान्य #नागरिकांसाठी #48तासांत #केंद्रसरकार #5मोठेनिर्णय
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ‘देवेंद्र फडणवीसांच्या पुतण्याला लस कशी मिळाली ?, व्हायरल पोस्ट लगेच केली डिलिट
Next Article काँग्रेस नेते राहुल गांधींना कोरोनाची लागण

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?