Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अभिनेते किशोर नांदलसकर यांचे कोरोनाने निधन, ‘जिस देश में गंगा रहता है’ मधील सन्नाटा काळाच्या पडद्याआड
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsटॉलीवुडमहाराष्ट्र

अभिनेते किशोर नांदलसकर यांचे कोरोनाने निधन, ‘जिस देश में गंगा रहता है’ मधील सन्नाटा काळाच्या पडद्याआड

Surajya Digital
Last updated: 2021/04/20 at 4:34 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

मुंबई : मराठी आणि हिंदी अभिनेते किशोर नांदलसकर यांचे निधन झाले आहे. नांदलसकर यांचे आज (मंगळवार) दुपारी कोरोनाने निधन झाले. मागील दोन आठवड्यांपासून ते ठाण्याच्या कोविड सेंटरमध्ये होते. परंतू आज त्यांचे निधन झाले. त्यांनी इना मिना डिका चित्रपटातून आपल्या करियरची सुरूवात केली. नांदलसकर यांनी 30 चित्रपटांत काम केले आहे. जिस देश मे गंगा रहता है, येड्यांची जत्रा, करामती यांसारख्या चित्रपटांत त्यांनी काम केले.

ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांच करोनाने निधन.💐💐
अनेक हिंदी आणि मराठी चित्रपट, मालिका आणि नाटकांमधून उल्लेखनीय कामगिरी.
शेजारी शेजारी, हळद रुसरी कुंकू हसल, पाहुणा, वास्तव, जीस देश मे गंगा रेहता है, सिंघम या त्यांच्या काही गाजलेल्या कलाकृती.#KishorNandlaskar #सन्नाटा pic.twitter.com/gsd2rmDujJ

— 💫 श्रीगणेशा ♐🚩🇮🇳 (@GaneshPandule10) April 20, 2021

ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं करोनाने निधन झालं. काही दिवसांपूर्वीच त्यांना करोनाची लागण झाली होती. ‘जिस देश में गंगा रहता है’ या गोविंदाच्या सिनेमातील नांदलस्करांचं ‘सन्नाटा’ नावाचं कॅरेक्टर विशेष गाजलं.

स न्ना टा 🙏🏻#kishornandlaskar

भावपूर्ण श्रध्दांजली!!! pic.twitter.com/BgdI93ATsW

— Vaibhav Shetkar (@vaibhavshetkar) April 20, 2021

नांदलस्कर यांनी 40 नाटके, 30 हून अधिक मराठी आणि हिंदी सिनेमे तसेच 20 हून अधिक मालिकांमध्ये काम केले आहे. तर ‘नाना करते प्यार’ हे त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर केलेलं शेवटचं नाटक होतं.

मराठीतील ज्येष्ठ कलाकार, एक चुरस्त्र अभिनेते हरपला आहे. नांदलस्कर यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर ठाण्यात उपचार सुरु होते.

https://twitter.com/ravimakeup/status/1384453932961832965?s=20

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

मात्र, उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खारेपाटण तालुक्यातील शेजवली हे किशोर नांदलस्कर यांचे मूळ गाव. त्यांचा जन्म मात्र मुंबईतच झाला होता. ‘न्यू इरा हायस्कूल’ आणि ‘युनियन हायस्कूल’ येथे त्यांचं शालेय शिक्षण झाले होते.

कोरोनापेक्षाही भयानक आणि घातक कीड म्हणजे 'राजकारण'
https://t.co/tjMF5NZgGi

— Surajya Digital (@SurajyaDigital) April 19, 2021

किशोर नांदलस्कर यांना अभिनयाचा वारसा त्यांचे वडील खंडेराव यांच्याकडून मिळाला होता. त्यांच्यामुळे घरातील वातावरणातच नांदलस्कर यांनाही अभिनयाचं वेड त्यांना लागले होते. नांदलस्कर यांनी आत्तापर्यंत सुमारे ४० नाटके, २५ हून अधिक मराठी व हिंदूी चित्रपट आणि २० हून अधिक मालिकांमधून काम केले होते. ‘नाना करते प्यार’ हे त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर काम केलेले शेवटचे नाटक. ‘सारे सज्जन’, ‘शेजारी शेजारी’, ‘हळद रुसली कुंकू हसले’ आणि इतर काही चित्रपट त्यांच्या नावावर जमा आहेत.

महेश मांजरेकर यांच्या ‘वास्तव’ चित्रपटातून नांदलस्कर यांचा बॉलीवूडच्या रुपेरी पडद्यावर प्रवेश झाला. ‘जिस देश में गंगा रहता है’ (गोविंदा), ‘तेरा मेरा साथ है’ (अजय देवगण), ‘खाकी’ (अमिताभ बच्चन) यांच्याबरोबर काम करायची संधी त्यांना मिळाली. ‘चाल जाए पर वचन न जाए’, ‘ये तेरा घर ये मेरा घर’, ‘हलचल’, ‘सिंघम’ या हिंदी चित्रपटांतही त्यांची भूमिका होती. नांदलस्कर यांच्या जाण्याने एक जाणता कलाकार हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त केली जात आहे.

ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांच करोनाने निधन.💐💐
अनेक हिंदी आणि मराठी चित्रपट, मालिका आणि नाटकांमधून उल्लेखनीय कामगिरी.
शेजारी शेजारी, हळद रुसरी कुंकू हसल, पाहुणा, वास्तव, जीस देश मे गंगा रेहता है, सिंघम या त्यांच्या काही गाजलेल्या कलाकृती.#KishorNandlaskar pic.twitter.com/4MyLCl9UfL

— Digvijay Bagal – दिग्विजय बागल (@Digvijay4Youth) April 20, 2021

You Might Also Like

‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का

स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष

भिंगारमध्ये श्री संत जनार्दन स्वामी महाराज दिंडीचे राष्ट्रवादीच्या वतीने भक्तीभावाने स्वागत

केडगाव हत्येचा लागला छडा , 3 अटकेत

कोल्हापूर जिल्हा म्हणजे कुस्तीची पंढरी – रविंद्र चव्हाण

TAGGED: #Actor #kishornandlaskar #nomore, #अभिनेते #किशोरनांदलसकर #कोरोनाने #निधन
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article काँग्रेस नेते राहुल गांधींना कोरोनाची लागण
Next Article तन्मय फडणवीस माझा दूरचा नातेवाईक, देवेंद्र फडणवीसांनी केले हात वर

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?