Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सिमेवरील सैनिकांसाठी पुणेकरांनी पाठविले राखीचे ‘प्रेमबंधन’; दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात झाला कार्यक्रम
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

सिमेवरील सैनिकांसाठी पुणेकरांनी पाठविले राखीचे ‘प्रेमबंधन’; दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात झाला कार्यक्रम

Surajya Digital
Last updated: 2020/07/27 at 2:45 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

पुणे : सैनिक मित्र परिवार व सहयोगी संस्थांतर्फे राखी पौर्णिमेनिमित्त व कारगिल विजय दिवसाचे औचित्य साधून देशाच्या सिमेवर लढणा-या जवानांसाठी पुणेकरांच्यावतीने 11 हजारपेक्षा जास्त राख्या पाठविण्यात आल्या. बुधवार पेठेतील कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात प्रातिनिधीक स्वरुपात झालेल्या कार्यक्रमात उपमहापौर सरस्वती शेंडगे यांच्या हस्ते राखीपूजन झाले.

शस्त्र हातात घेऊन निधड्या छातीने देशाच्या सिमेवर शत्रूंच्या गोळ्यांचा सामना करण्यासाठी सज्ज असणा-या सैनिकांच्या पोलादी मनगटांकरिता पुणेकरांनी राखीचे प्रेमबंधन पाठविले. गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचे संकट असले तरी देशाच्या सिमेवर रक्षणाकरीता अहोरात्र सज्ज असलेल्या जवानांना पुण्यातून पाठविण्यात येणा-या राख्यांचे पूजन करण्यात आले.

(तुमचे हक्काचे ‘सुराज्य डिजिटल‘ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि टेलिग्रामवरही https://t.me/Surajyadigital उपलब्ध)

यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिषा झेंडे, दत्तमंदिर ट्रस्टचे उत्सवप्रमुख शिरीष मोहिते, आनंद सराफ, लायन्स क्लब ऑफ पुणे विजयनगरचे अध्यक्ष अविनाश शहाणे, राजश्री शेठ, पराग ठाकूर, कल्याणी सराफ, सुरेखा होले, डिंपल ओसवाल, अल्पा भावसार आदी उपस्थित होते.

संस्थेचे सदस्य आनंद सराफ म्हणाले, भारतीय सण हे नाती दृढ करणारे सण आहेत. गेल्या काही वर्षांपासून या सणांना सामाजिकतेची जोड मिळत आहे. समाजाच्या या कृतज्ञतेचा प्रत्यय सैनिकांना करुन देण्यासाठी व त्यांनाही सण-उत्सव साजरा करता यावा, याकरीता 1998 पासून हा उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहे. देशाच्या सिमाभागांत 150 पोस्टवर प्रत्येक रेजिमेंटमध्ये या राख्या पाठविल्यानंतर तेथे पूजन करुन सैनिकांपर्यंत पोहोचविल्या जातात. अनेकदा सैनिकांकडून राख्यांना उत्तर म्हणून पत्र आणि भेटवस्तूदेखील पुणेकरांना पाठविल्या जातात.

” देशाच्या सिमेवर लढणारे सैनिक देशासाठी आपले सर्वस्व अर्पण करतात, त्यामुळे त्यांची आठवण प्रत्येकाने ठेवायला हवी. पुण्यातून पाठविण्यात येणा-या राख्यांची सिमेवरील सैनिक दरवर्षी वाट पहात असतात. सैनिक हाच ध्यास आणि सैनिक हा देशाचा श्वास ही भावना मनात ठेऊन सैनिक मित्र परिवार व सहयोगी संस्थांतर्फे पाठविण्यात येणा-या राख्यांचा उपक्रम कौतुकास्पद आहे”
सरस्वती शेंडगे – उपमहापौर, पुणे

You Might Also Like

उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल

पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला

न्यायाधीश समाजाशी एकरुप असावा – भूषण गवई

हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा

TAGGED: #दगडूशेठहलवाईदत्तमंदिर #राख्या #सैनिकमिञपरिवार #सहयोगीसंस्था
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अमिताभ यांनी व्यक्त केले ब्लॉगवर अनुभव; माझ्याजवळ कोणीच येत नाही, कोरोना उपचाराला झाले 15 दिवस
Next Article विरोधी पक्षाकडून शुभेच्छा; माञ स्टिअरिंग मुख्यमंञ्याच्या हातात असले तरी दिशा मागे बसलेले ठरवतात

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?