Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: दहावीच्या परीक्षा रद्द; बारावीच्या परीक्षा होणार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

दहावीच्या परीक्षा रद्द; बारावीच्या परीक्षा होणार

Surajya Digital
Last updated: 2021/04/20 at 6:57 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : राज्य मंत्रीमंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर बारावीच्या परीक्षा होणार आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याची माहिती दिली. तर दुसरीकडे राज्यात कडक लॉकडाऊन लागणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

'देवेंद्र फडणवीसांच्या पुतण्याला लस कशी मिळाली ?, व्हायरल पोस्ट लगेच केली डिलिट https://t.co/MA2il4WWVk

— Surajya Digital (@SurajyaDigital) April 20, 2021

कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करून याची माहिती दिली. तसेच बारावीच्या परीक्षा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत परीक्षेच्या बाबतीत एकमताने निर्णय घेण्यात आला.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

राज्यात कोरोनाचा  वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता इयत्ता 10 वीच्या बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. याची माहिती मंत्री राजेश टोपे  यांनी दिली असून या सविस्तर माहिती लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. तर बारावी बोर्डाच्या परीक्षा होणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

तन्मय फडणवीस माझा दूरचा नातेवाईक, देवेंद्र फडणवीसांनी केले हात वर https://t.co/FaFXMkPFLv

— Surajya Digital (@SurajyaDigital) April 20, 2021

दहावी बोर्डाच्या परीक्षांसंदर्भात मंत्रिमंडळात चर्चा झाली. यावर्षी परीक्षा रद्द करुन विद्यार्थ्यांना प्रमोट करण्यात यावे यासंदर्भात मंत्रिमंडळात एकमताने निर्णय झाला असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

As the current atmosphere is not conducive to exams, we had earlier postponed our exams while requesting other boards to reschedule theirs. In response to our communication, other boards have now cancelled their exams, so maintaining parity, we have cancelled ours too.

— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) April 20, 2021

या संदर्भात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं, दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असून विद्यार्थ्यांचं इंटरनल असेसमेंट होणार असून त्या संदर्भात शिक्षण क्षेत्रातील तज्ञांसोबत चर्चा करुन सविस्तर माहिती जाहीर करण्यात येईल. तर बारावीची परीक्षा मे अखेरीस होण्याची शक्यता आहे.

अभिनेते किशोर नांदलसकर यांचे कोरोनाने निधन, 'जिस देश में गंगा रहता है' मधील सन्नाटा काळाच्या पडद्याआड https://t.co/ahTcsCoExF

— Surajya Digital (@SurajyaDigital) April 20, 2021

दहावीच्या शाळा यंदा ऑनलाईन पद्धतीने झाल्या त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता देशातील इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातील दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. मात्र, या संदर्भात काही असेसमेंट घ्यायच्या असतील तर त्यासंदर्भातला निर्णय घेण्यात येईल असंही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

You Might Also Like

थोरात कारखान्याच्या मदतीने हायटेक बसस्थानकाची स्वच्छता

मालेगाव स्फोट प्रकरणाचा निकाल पुन्हा लांबणीवर

छत्तीसगड : चकमकीत 8 नक्षलवादी ठार, 5 जवान हुतात्मा

दोन दिवसांपूर्वी झाला विवाह अन् फौजी निघाला देशसेवेसाठी

अंगणवाडी सेविकांच्या कुटुंबासाठी मोफत आरोग्य तपासणी – आदिती तटकरे

TAGGED: #10th #exam #canceled #Twelfth #standard #examination #held, #दहावीच्या #परीक्षा #रद्द #बारावीच्या #परीक्षा #होणार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article “…आणि नालायक क्रिकेटपटू क्रिकेट खेळण्यात गुंग आहेत”
Next Article मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांच्या पत्नी कोरोना पॉझिटिव्ह

Latest News

थोरात कारखान्याच्या मदतीने हायटेक बसस्थानकाची स्वच्छता
महाराष्ट्र May 8, 2025
मालेगाव स्फोट प्रकरणाचा निकाल पुन्हा लांबणीवर
महाराष्ट्र May 8, 2025
पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम नष्ट
देश - विदेश May 8, 2025
भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीममुळे पाकिस्तानी हल्ला निष्क्रीय
देश - विदेश May 8, 2025
ऑपरेशन सिंदूर’मध्ये 100 दहशतवादी ठार
देश - विदेश May 8, 2025
छत्तीसगड : चकमकीत 8 नक्षलवादी ठार, 5 जवान हुतात्मा
महाराष्ट्र May 8, 2025
दोन दिवसांपूर्वी झाला विवाह अन् फौजी निघाला देशसेवेसाठी
महाराष्ट्र May 8, 2025
अंगणवाडी सेविकांच्या कुटुंबासाठी मोफत आरोग्य तपासणी – आदिती तटकरे
महाराष्ट्र May 8, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?