Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: भाजपाने केला मोठा संकल्प; महाराष्ट्रात नेते लागले आजपासून कामाला
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

भाजपाने केला मोठा संकल्प; महाराष्ट्रात नेते लागले आजपासून कामाला

Surajya Digital
Last updated: 2020/07/27 at 4:03 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : महाराष्ट्रात आगामी काळात कोणाचीही मदत न घेता सरकार आणण्याच्या तयारीला लागा अशा सूचना भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी दिल्या आहेत. पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीत ते बोलत होते.

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जे पी नड्डा यांनी संवाद साधला. या बैठकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हजर होते. भाजपाने आपला विस्तार करण्यावर लक्ष दिलं पाहिजे असंही यावेळी त्यांनी सांगितलं.

(तुमचे हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि टेलिग्रामवरही उपलब्ध)

“पुढच्या वेळी एकट्याने महाराष्ट्र सांभाळण्याची आपली तयारी असली पाहिजे. याची तयारी आजपासूनच आपल्याला करायची आहे. कोणाचीही सोबत नाही, मदत नाही असा संकल्पच केला पाहिजे.  एकटी भाजपा महाराष्ट्रात कमळ आणणार, प्रत्येक ठिकाणी कमळ असेल यासाठी कामाला लागा. पक्षाचा प्रत्येक उमेदवार जिंकेल यासाठी प्रयत्न करा,” असं जे पी नड्डा यांनी सांगितलं आहे.हा इशारा मिळाल्याने महाराष्ट्रातील भाजपाचे नेते आजपासून संकल्पसिद्धीसाठी कामाला लागले आहेत.

* तंगड्या तोडण्याची भाषा

देवेंद्र फडणवीस यांनीदेखील राज्य सरकारवर टीका केली आहे. “आपल्या अपयशावरुन लक्ष हटवण्यासाठी वारंवार सरकार पाडण्याचा प्रयत्न असल्याचं तुणतुणं वाजवलं जात आहे. आम्हाला सरकार पाडण्यात रस नाही. तुम्ही एकमेकांच्या तंगड्या तोडण्यास सक्षम आहात. अंतर्विरोधानेच सरकार पडणार आहे.  त्यानंतर महाराष्ट्राचे भवितव्य काय ठरवून दाखवू. हे जनतेने निवडून दिलेलं सरकार नाही. हे बेईमानीने आलेलं सरकार आहे.  जनेतेने आम्हाला आणि सोबत असणाऱ्या पक्षां निवडून दिलं होतं,” असं यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. भाजपाचा डीएनए संघर्षाचा असून जनतेसाठी संघर्ष करत राहू असंही ते म्हणाले आहेत.

* कोरोनात घोटाळा केल्याचा आरोप

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपल्या स्वार्थासाठी एकत्र येऊन सरकार स्थापन केलं आहे. भाजपा वारंवार त्यांना उघडं पाडत आहे. निर्लज्जपणे आणि स्वार्थासाठी हे सरकार चालवलं जात आहे. सरकारमध्ये अंतर्विरोध आहे. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यास सरकार अपयशी ठरलेलं असून हे लोकांसमोर आणलं पाहिजे. कोविडची स्थिती हाताळतानाही त्यांनी घोटाळा केल्याचं मला कळालं आहे,” असा गंभीर आरोप जे पी नड्डा  यांनी केला आहे.

You Might Also Like

पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा

एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद

‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत

राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक

TAGGED: #भाजपा #जेपीनड्डा #कामाला #आरोप #कोरोना
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article विरोधी पक्षाकडून शुभेच्छा; माञ स्टिअरिंग मुख्यमंञ्याच्या हातात असले तरी दिशा मागे बसलेले ठरवतात
Next Article मॉर्निंग वॉकला गेलेल्या दोन वृध्दांचा चिरडून मृत्यू

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?