मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भूमिकेवरून शिवसेनेने टीका केली आहे. कोरोनाचे संकट मोठे आहे. पण यातून बचाव कसा करावा याचा उपाय पंतप्रधानांनी सांगितला नाही. लोकांनी आपले आप्त गमावलेत. त्याबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केले, पण यापुढे बळी वाढू नये म्हणून काय करताय? त्यांच्या भाषणातून ऊर्जा मिळेल असं वाटत होते. पण संकट मोठे आहे, तुमचे तुम्ही बघा, काळजी घ्या, हे त्यांच्या भाषणाचे सार असल्याचे शिवसेनेनं म्हटलं.
धर्म माणुसकीचा ! ६० हिंदू लोकांवर मुस्लीम तरुणांनी केले अंत्यसंस्कार, रोजा ठेवूनही सकाळपासून हॉस्पिटल ते स्मशानभूमीवर फेऱ्या https://t.co/3AHCSusyGl
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 22, 2021
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्राच्या अग्रलेखातून वाढता कोरोना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जनतेशी संवाद यावर भाष्य केले आहे.
“पंतप्रधान मोदी म्हणतात त्याप्रमाणे कोरोनाचे संकट मोठे आहे. कोरोनाचे जणू तुफानच आहे, पण तुफानापासून बचाव कसा करायचा यावर उपाय त्यांनी सांगितला नाही. पंतप्रधानांच्या भाषणातून ऊर्जा मिळेल असे वाटले होते. पण ‘‘संकट मोठे आहे, तुमचे तुम्ही बघा, काळजी घ्या,’’ हेच त्यांच्या भाषणाचे सार आहे.
शिखर धवनने केला 'गब्बर' पराक्रम https://t.co/8YHpgBPChu
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 22, 2021
पंतप्रधान किंवा त्यांच्या सहकाऱ्यांनी ऑक्सिजनपूर्तीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. आज त्याचीच सर्वाधिक गरज आहे. त्याऐवजी सगळेच जण हवेत भाषणांचा कार्बनडायऑक्साईड सोडून जहर फैलावीत आहेत,” अशी सणसणीत टीका शिवसेनेनं केली आहे.
पंतप्रधान मोदी म्हणतात त्याप्रमाणे कोरोनाचे संकट मोठे आहे. कोरोनाचे जणू तुफानच आहे, पण तुफानापासून बचाव कसा करायचा यावर उपाय त्यांनी सांगितला नाही. लोकांनी आपले आप्त गमावले आहेत. त्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी दुःख व्यक्त केले, पण यापुढे ‘बळी’ वाढणार नाहीत याबाबत तुम्ही काय करताय? महाराष्ट्र काय किंवा संपूर्ण राष्ट्र काय, कोरोनाची स्थिती नाजूक आहे. पंतप्रधानांच्या भाषणातून ऊर्जा मिळेल असे वाटले होते. पण ‘‘संकट मोठे आहे, तुमचे तुम्ही बघा, काळजी घ्या,’’ हेच त्यांच्या भाषणाचे सार आहे. सारवासारवीने काय होणार! असा सवालही शिवसेनेनं केला आहे.
महाराष्ट्रात उद्यापासून लॉकडाऊन, आणखी कडक निर्बंध
https://t.co/NfGGtz5KuN— Surajya Digital (@SurajyaDigital) April 21, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
महाराष्ट्रात दहावीच्या परीक्षा रद्द कराव्या लागल्या आहेत. केंद्र सरकारनेही मागच्या आठवडय़ात ‘सीबीएसई’च्या परीक्षा रद्द केल्या आहेत. गुजरात, मध्य प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश, कर्नाटकची स्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. कोरोना संसर्ग आटोक्यात यावा म्हणून गुजरात सरकारने दोन आठवडय़ांचे लॉकडाऊन लागू करावे अशी शिफारस इंडियन मेडिकल असोसिएशनच्या राज्य शाखेने केली आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यात कडक निर्बंध लावूनदेखील कोरोना नियंत्रणात येत नाही. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली जनता रस्त्यावर फिरते आहे. त्यामुळे लॉक डाऊन हीच अत्यावश्यक सेवा बनली आहे. अशा गंभीर परिस्थितीशी सामना कसा करावा याबाबत पंतप्रधान जनतेला दिलासा देतील असे वाटत होते.
नाशिक दुर्घटना : निष्काळजीपणाने अजून किती बळी घेणार आहात?, सखोल चौकशीची मागणी https://t.co/NoZuqHkkF6
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 21, 2021
* पीएम लॉकडाऊन टाळण्याचा सल्ला देतायत
महाराष्ट्रासारख्या राज्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक लॉकडाऊन हाच पर्याय असताना पंतप्रधान मोदी यांनी ‘‘लॉक डाऊन टाळा’’ असा सल्ला दिला आहे. राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. कालच्या चोवीस तासांत 64 हजार रुग्ण एका महाराष्ट्रात झाले. मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे किमान 15 दिवसांसाठी संपूर्ण टाळेबंदी करा, अशी राज्याच्या अनेक मंत्र्यांची मागणी आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत काय तो निर्णय घेतीलच, पण ‘‘लॉक डाऊन टाळा’’ असा सल्ला आपले पंतप्रधान कोणत्या आधारावर देत आहेत? असा सवालही शिवसेनेनं उपस्थित केला आहे.