नवी दिल्ली : माकप नेते सीताराम येचुरी यांना पुत्रशोक झाला. आशिष येचुरी यांचे कोरोनावरील उपचारांदरम्यान गुरुवारी सकाळी निधन झाले. आशिष यांच्यावर गुरुग्राममधील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. सीताराम येचुरी यांनी ट्विटरवरुन स्वतःच्या पुत्र निधनाची बातमी दिली.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1385248309422419971?s=19
34 वर्षीय आशिष येचुरी हे व्यवसायाने पत्रकार होते. राजधानी दिल्लीतील एका आघाडीच्या वर्तमानपत्रात ते सिनिअर कॉपी एडिटर म्हणून कार्यरत होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
“मी अत्यंत दुःखाने कळवू इच्छितो, की माझा मोठा मुलगा आशिष येचुरी याचे आज सकाळी कोरोनामुळे निधन झाले. आशिषवरील उपचारादरम्यान आमच्या मनात आशेचा किरण जागवणाऱ्या प्रत्येकाचे आम्ही आभार मानतो. डॉक्टर, नर्स, फ्रंटलाईन आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी आणि आमच्या पाठीशी उभे राहिलेले असंख्य जण” अशा आशयाचे ट्वीट सीताराम येचुरी यांनी केले आहे.
https://twitter.com/SitaramYechury/status/1385128073218060295?s=19
गुरुग्राममधील खासगी रुग्णालयात गुरुवारी पहाटे सहा वाजता आशिष येचुरी यांनी अखेरचा श्वास घेतला. कोरोना संसर्गानंतर दोन आठवड्यांपूर्वी आशिष येचुरींना होली फॅमिली रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात हलवण्यात आले होते.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1385196863670800387?s=19
याचबरोबर, आशिष येचुरी यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर, नर्स आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांचे सीताराम येचुरी यांनी ट्विटद्वारे आभार मानले आहेत. दरम्यान, आशिष येचुरी हे पत्रकार होते. दिल्लीतील एका वृत्तपत्रात सिनिअर कॉपी एटिडर म्हणून ते काम करत होते.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1385191889373126660?s=19