Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पंढरपूरमध्ये रुग्णालय फुल्ल, निवडणूक आली अंगलट, लोकप्रतिनिधी जबाबदारी स्वीकारणार का?
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

पंढरपूरमध्ये रुग्णालय फुल्ल, निवडणूक आली अंगलट, लोकप्रतिनिधी जबाबदारी स्वीकारणार का?

Surajya Digital
Last updated: 2021/04/22 at 11:15 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

सोलापूर / पंढरपूर  : कोरोनामुळे राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांचे निधन झाले आणि यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीनंतरचे भीषण चित्र समोर आले आहे. कोरोना रुग्णसंख्येत प्रचंड वाढ होत आहे. उपचाराकरिता सर्व रुग्णालये फुल्ल झाली आहेत. पोटनिवडणूक पंढरपूरकरांच्या अंगलट आल्याचे बोलले जात आहे.

माकप नेते सीताराम येचुरींच्या पत्रकार मुलाचा कोरोनाने मृत्यू https://t.co/2g9VvfLp7R

— Surajya Digital (@SurajyaDigital) April 22, 2021

किमान आतातरी उपमुख्यमंत्री अजित पवार असोत किंवा भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस असोत ज्यांच्यामुळे सभांना अलोट गर्दी झाली त्यांनी किमान आता याची जबाबदारी स्वीकारत पंढरपूर मंगळवेढ्यासाठी जादाचे रेमडेसिवीर, ऑक्सिजन, डॉक्टर व वैद्यकीय स्टाफ याचे नियोजन करून देणे आवश्यक आहे.

वीज दरवाढीचा झटका, जास्त पैसे मोजावे लागणार https://t.co/Kqylq1VhLl

— Surajya Digital (@SurajyaDigital) April 22, 2021

हाऊसफुल्ल रुग्णालय आणि आरोग्यसेवेवरील ताण पाहून निवडणूक चांगलीच अंगलट आली म्हणायची वेळ आता जनतेवर आली आहे. गावेच्या गावे आजारी पडू लागली असून हॉस्पिटलमध्ये रुग्ण ठेवायला जागा नाही. यातच रोज शेकडोंच्या संख्येने नवीन रुग्ण समोर येत आहेत. ना रेमडेसिवीर, ना ऑक्सिजन, ना उपचारासाठी बेड अशा अवस्थेत जनतेसमोर कोरोनाचा मृत्यू ‘आ’ वासून उभा आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

अशी स्थिती राज्यात सर्वत्र असली तरी त्याची भीषणता आणि कहर पंढरपूर मंगळवेढा येथे जास्त पाहायला मिळतोय. राष्ट्रवादी आणि भाजपच्या सभा झालेल्या भोसे, बोराळे सारख्या अनेक गावात सध्या घरटी रुग्ण सापडू लागले असून तपासणीच नसल्याने रुग्णांची मर्यादित संख्या समोर येत आहे. पण गावागावात फिरून माहिती घेतल्यावर परिस्थिती किती बिकट बनत चाललीय याचा अंदाज येतो. मंगळवेढा तालुक्यात 25 गावात सध्या कोरोनाचा कहर सुरु असून इतर गावातही रुग्णांचा आकडा फुगू लागला आहे.

विद्यापीठांच्या सर्व परीक्षा ऑनलाईन होणार https://t.co/h6XJHKcyIW

— Surajya Digital (@SurajyaDigital) April 22, 2021

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्येक सभेत आपल्याच कार्यकर्त्यांचे मास्कबाबत अतिशय कटू शब्दात कान टोचले असले तरी त्यांच्या आणि फडणवीस यांच्या सभेच्या गर्दीचे दुष्परिणाम समोर येऊ लागले आहेत. राष्ट्रवादीच्या प्रचाराची धुरा सांभाळणारे आमदार संजय शिंदे असतील किंवा आमदार अमोल मिटकरी असतील भाजपचे प्रचार प्रमुख बाळा भेगडे असतील ही मंडळी आता कोरोनाग्रस्त झाली आहेत. शेकडोच्या संख्येने लहान मोठे कार्यकर्तेही आता कोरोनावर उपचार घेत आहेत. मात्र, या निवडणुकीमुळे कोरोनाचे अमाप पीक पंढरपूर आणि मंगळवेढ्यात आल्याने गोरगरीब नागरिकांना मात्र याचा नाहक त्रास सोसावा लागत आहे.

गरजूंना ऑक्सिजन मिळवून देण्यासाठी विकली महागडी एसयूव्ही कार https://t.co/Q8qQ6hZoVG

— Surajya Digital (@SurajyaDigital) April 22, 2021

ज्यांना उपचार मिळत नाहीत अशांची प्रेतामागून प्रेते स्मशानभूमीत अंतिमसंस्कारासाठी वाट पाहत थांबलेली आणि मिळेल त्या ठिकाणी सर्वत्र जळत्या चिता असे भीषण चित्र सध्या पंढरपूरमध्ये पाहायला मिळत आहे.

धर्म माणुसकीचा ! ६० हिंदू लोकांवर मुस्लीम तरुणांनी केले अंत्यसंस्कार, रोजा ठेवूनही सकाळपासून हॉस्पिटल ते स्मशानभूमीवर फेऱ्या https://t.co/3AHCSusyGl

— Surajya Digital (@SurajyaDigital) April 22, 2021

* निवडणुकीतून काय कमावले, किती गमावले

लसीबाबत या भागावर होत असलेला अन्याय तातडीने दूर करून योग्य प्रमाणात लसींचा पुरवठा वेळेत केल्यास ही महामारी रोखाने शक्य होणार आहे. अन्यथा या निवडणुकीतून किती बळी गेले हे मोजनेही अवघड बनणार आहे. सध्या पंढरपूर स्मशानात रोज सरासरी 8 ते 10 जणांचा कोरोनामुळे मृत्यू होतोय तर मंगळवेढा येथेही थोड्याफार फरकाने हीच परिस्थिती आहे. विधानसभेच्या 288 पैकी एका आमदारासाठी दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेची केलेली निवडणुकीतून काय कमावले पेक्षा किती गमावले याचे उत्तर महाराष्ट्राला द्यावे लागेल.

दोन दिवसांपूर्वी चाहत्याने किस केलेली अभिनेत्री अर्शी खान कोरोना पॉझिटिव्ह #ArshiKhan #surajyadigital #सुराज्यडिजिटल #actresses #coronavirus pic.twitter.com/YWxxdzEzrz

— Surajya Digital (@SurajyaDigital) April 22, 2021

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Hospital #Pandharpur #full #election #people's #representative #accept #responsibility?, #पंढरपूर #रुग्णालय #फुल्ल #निवडणूक #अंगलट #लोकप्रतिनिधी #जबाबदारी #स्वीकारणारका?
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article माकप नेते सीताराम येचुरींच्या पत्रकार मुलाचा कोरोनाने मृत्यू
Next Article विरारमधील रूग्णालयाला आग; मृतांचा आकडा 13 वर

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?