नवी दिल्ली : देशावर करोना संसर्गाचे मोठे संकट घोंगावत आहे. देशभरात करोना रुग्णांची संख्या वाढत असून रुग्णालये अपुरी पडत आहे. अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. ऑक्सिजनअभावी अनेकांना जीव गमवावा लागत आहे. आरोग्य यंत्रणा करोनाविरुद्ध लढत असताना आता हवाई दलाने देखील या लढाईत पुढाकार घेतला आहे.
#WATCH Indian Air Force (IAF) roped in to transport oxygen tanks#COVID19 pic.twitter.com/7TqLdwYOlh
— ANI (@ANI) April 23, 2021
हवाईदलाच्या पथकाने आता ऑक्सिजन कंटेनर्स, आरोग्यांसंबंधीत उपकरणे आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना एअरलिफ्ट करण्याची जबाबदारी घेतली आहे. भारतीय हवाई दलाच्या C17 या विमानातून दोन मोठे ऑक्सिजन कंटेनर्स तर IL 76 मधून एक रिकामी कंटेनर्स बंगालच्या पन्नागढमध्ये पोहचवण्यात आले.
तसेच भारतीय हवाईदलानं डीआरडीओचे ऑक्सिजन कंटेनरदेखील बंगळुरूहून – दिल्लीच्या कोव्हिड सेंटरपर्यंत पोहचवले आहेत. भारतीय हवाई दलाकडून देशातील विविध राज्यांची ऑक्सिजनची गरज भागवण्यासाठी अनेक मोहिमा सुरु झाल्या आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
भारतीय वायुसेनेने ट्विटरवर लिहिले आहे की, ‘आयएएफचा ताफा कोरोनाविरुद्ध लढत आहे. वैद्यकीय कर्मचारी, आवश्यक उपकरणे आणि औषधे देशभरातील कोविड रुग्णालयात पोहोचवली जात आहेत.
C-17 and IL-76 aircraft airlifted cryogenic oxygen containers from Air Force Station Hindan to Panagarh for recharging, in support of the fight against Covid-19. Similar airlift tasks are underway across the country. pic.twitter.com/1GMdOBRqWY
— Indian Air Force (@IAF_MCC) April 23, 2021
यासह जर्मनीहून तब्बल 23 मोबाईल ऑक्सिजन जनरेशन प्लांट्सही आता भारतीय हवाईदल एअरलिफ्ट करणार आहे. यामुळे अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे. भारतीय हवाईदलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, IAF ने दिल्लीत डीआरडीओकडून उभारण्यात आलेल्या कोव्हिड 19 रुग्णालयात कोचीन, मुंबई, विशाखापट्टनम आणि बंगळुरू अशा अनेक भागांतून औषधं, उपकरणं आणि नर्सिंग स्टाफलाही एअरलिफ्ट केलं आहे. तसेच त्यांना विविध राज्यात उतरवले आहे.
मोठी दुर्घटना – जीप गंगेत कोसळली; 9 मृतदेह https://t.co/Ui2nVrKfJ4
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 23, 2021
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आयोगाची 'रोड शो' वर बंदी https://t.co/4hjHJdGRCd
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 23, 2021
* डीआरडीओकडूनही पुरेपूर मदत
डीआरडीओचे चेअरमन जी. सतीश रेड्डी यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना सांगितले की, आतापर्यंत दिल्लीत 250 बेड क्षमता असलेली कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. त्याची क्षमता 500 बेडवर नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. याशिवाय पाटण्यातील ईएसआयसी हॉस्पिटलमध्ये 500 बेडची व्यवस्था झाली आहेत. लखनऊमध्ये 450 बेड व वाराणसीमध्ये 750 बेडची क्षमता असलेल्या केंद्रांची उभारणी सुरू आहे. यासह डीआरडीओकडून अहमदाबादमध्येही 900 बेडचे कोविड रुग्णालय बनवण्याचे काम सुरू आहे.
सुमित्रा महाजन यांच्या निधनाची खोटी बातमी, दिग्गज नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली https://t.co/5a25AgSwdd
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 23, 2021