टेंभुर्णी : माढा तालुक्यातील भीमानगर येथील कोरोनाची लागण झालेल्या एमएसईबी कर्मचा-याच्या संपर्कात आलेल्या चौघांना कोरोनाची लागण झाल्याचा सोमवारी सकाळी अहवाल आला आहे.
आलेल्या अहवालात बाधित रुग्णांची मुलगी आणि त्याने उपचार घेतलेल्या भीमानगरच्या खाजगी हॉस्पिटलमधील एक कर्मचारी व दरम्यानचे काळात त्याचे रुममध्ये उपचार घेत असलेली महिला आणि तिचा पती यांचा समावेश आहे. तर २४ तासात चौघाचे रिपोर्ट पॉझीटीव्ह आल्याने भीमानगरमध्ये भीतीचे वातावारण झाले आहे.
भीमानगर येथील रहिवाशी असलेल्या वायरमनचा २३ जुलै रोजी कोरोना पॉझीटीव्हचा अहवाल आला होता. त्याच्या संपर्कात आलेल्यांचे ९ जणांचे स्वब घेतले होते. पाच रिपोर्ट निगेटिव्ह तर चार पॉझीटीव्ह आले आहेत. यामध्ये रुग्णांची मुलगी व त्यांना उपचार दरम्यानच्या कालावधीत त्याचे रुममध्ये उपचार घेणारी महिला यांचे रविवारी राञी तर महिलेचा पती आणि हॉस्पिटलमधील एक कर्मचारी यांचे सोमवारी सकाळी कोरोना बाधित अहवाल आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि टेलिग्रामवरही उपलब्ध
भीमानगरमध्ये पाच कोरोना रुग्ण झाले आहेत. या चौघांचे संपर्कात आलेल्या २४ जाणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. एकाच दिवशी चार रुग्ण कोरोना पॉझीटीव्ह आढळून आल्याने तसेच खाजगी रुग्णालयातील कर्मचारी कोरोना बाधित आढळून आला असल्याने या परिसरातील नागरिक सतत उचारासाठी या हॉस्पिटलमध्ये येत होते. यामुळे
कोंढार भागासह भीमानगरमध्ये खळबळ उडाली आहे. पॉझीटिव्ह रुग्णांना कुर्डूवाडीतील कोविड सेंटरमध्ये हालवण्यात आले आहे. प्रशासनाकडून खासगी हॉस्पिटल सील केलेले आहे. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्याचे काम सुरु आहे.