Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ‘भारूडरत्न’ निरंजन भाकरे यांचे कोरोनाने निधन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

‘भारूडरत्न’ निरंजन भाकरे यांचे कोरोनाने निधन

Surajya Digital
Last updated: 2021/04/24 at 10:04 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

औरंगाबाद : भारुडरत्न निरंजन भाकरे यांचे शुक्रवारी कोरोनाने निधन झाले. ते 62 वर्षाचे होते. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. ‘बये तुला बुरगुंडा होईल गं’ या भारुड सादरीकरणाने ते राज्यभरात प्रसिद्ध होते. ‘सोंगी भारुड’ सादरीकरणानंतर काही वर्षांतच ते प्रसिद्ध झाले होते. तसेच भाकरे यांनी परदेशातही अनेक कार्यक्रम सादर केले. त्यांच्या निधनानंतर लोककलेची मोठी परंपरा पुढे घेऊन जाणारा एक बहुआयामी चेहरा हरवल्याची भावना व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा, सून, नातवंडे असा त्यांचा परिवार आहे.

बुरगुंडा हरपला…भारुडरत्न निरंजन भाकरे (ब्लॉग)https://t.co/C08KFuUcL2

— Surajya Digital (@SurajyaDigital) April 24, 2021

समस्त महाराष्ट्रात ‘भारूडरत्न’ अशी ओळख असलेले प्रसिद्ध लोककलावंत निरंजन भाकरे यांचे शुक्रवारी (23 एप्रिल) निधन झाले. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. मागील चार दिवसांपासून त्यांच्यावर औरंगाबादेतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते. दरम्यान उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.

भारुड या लोककला प्रकाराला आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवून देणारे भारुडरत्न निरंजन भाकरे यांच्या दुःखद निधनाची बातमी समजली. मातीतल्या लोककलेला ओळख मिळवून देणारा सच्चा कलाकार हरपला. त्यांच्या आत्म्याला शांती मिळू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना! pic.twitter.com/7CUjXl3krb

— Chandrakant Patil (@ChDadaPatil) April 23, 2021

महाराष्ट्राला समृद्ध असा लोककलेचा वारसा लाभला आहे. हा वारसा पुढे घेऊण जाण्याचं काम मराठवाड्याचे अस्सल लोककलावंत निरंजन भाकरे यांनी केले. भारुड या लोककलेला त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य अर्पण केले होते.  एकनाथ महाराज यांची भारूडं आधुनिक काळात लोकांच्या ओठांवर आणणारे लोककलावंत म्हणून निरंजन भारकरे यांची ओळख आहे.

'भारुडरत्न' निरंजन भाकरे यांचे आज निधन झाले. 2011 साली जागर हा जाणिवांचा पदयात्रेत नायगाव (सातारा) ते पुणे यात सहभागी होत प्रत्येक गावात स्त्री भ्रूणहत्या विरोधात भारुड भाकरे यांनी सादर केले होते. pic.twitter.com/TeVNcf6tpV

— Supriya Sule (@supriya_sule) April 23, 2021

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

निरंजन भाकरे यांनी लोककलेच्या माध्यमातून शेवटपर्यंत जनजागृती करण्याचे काम केले. त्यांनी व्यवनमुक्तीची पहाट हा कार्यंक्रम किक्येक वर्षे केला. त्यांच्या या कार्यक्रमामुळे त्यांना विशेष ओळख मिळाली. तसेच अनेक टिव्ही शो आणि वेरुळ अजिंठा महोत्वसामध्ये त्यांनी हिरिरीने सहभाग घेतलेला आहे. भरुडमधील सोंगी भारूड या प्रकारमुळे त्यांचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात परिचित झाले. त्यांनी सादर केलेलं ‘बये तुला बुरगुंडा होईल गं’ हे भारुड तर आजही कित्येकजण आवडीने पाहतात.

https://twitter.com/mesandeeppathak/status/1385657190078238722?s=19

महाराष्ट्रात आतापर्यंत अनेक लोककलावंत होऊन गेले. मात्र, भाकरे यांचे लोककलेतील काम कायम अजरमार राहील असेच आहे. त्यांच्या बये तुला गुरगुंडा होईल गं, हे भारुड अजूनही अनेकांचा तोंडावर आहे. त्यांच्या भारुड सादरीकरणामुळे त्यांना संपूर्ण मराष्ट्रात ओळख मिळाली होती. त्यांना लोककलेचा हा वारसा आपल्या परिवाराकडून मिळाला होता. हा वरसा नंतर त्यांनी संपूर्ण हयातभर जपला.

 

ऑक्सिजनसाठी शरद पवार मैदानात, १९० साखर कारखान्यांना दिले आदेश https://t.co/uaDDGWn7Lt

— Surajya Digital (@SurajyaDigital) April 23, 2021

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #Bharudratna #NiranjanBhakre #passesaway, #भारूडरत्न #निरंजनभाकरे #कोरोनाने #निधन
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article बुरगुंडा हरपला…भारुडरत्न निरंजन भाकरे
Next Article सीबीआयची अनिल देशमुखांवर एफआयआर दाखल, घर अन् इतर मालमत्तांवर छापे

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?