नवी दिल्ली : देशात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने गरिबांना मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत मे आणि जूनमध्ये मोफत शिधा देण्यात येणार असून ८० कोटी लोकांना ५ किलो दराने धान्य वाटप करण्यात येणार आहे. दरम्यान, केंद्र सरकार अन्नधान्यावर २६,००० कोटी रुपये सुरुवातीला खर्च करेल.
सीबीआयची अनिल देशमुखांवर एफआयआर दाखल, घर अन् इतर मालमत्तांवर छापे https://t.co/scBh9AMbgq
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 24, 2021
देशातील कोविड-१९च्या उद्रेकामुळे उद्भवलेल्या आर्थिक अडचणींमुळे गरीब आणि गरजू लोकांना सामना कराव्या लागणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी केंद्र सरकारने पुढील २ महिने अर्थात मे आणि जून २०२१ या कालावधीसाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा २०१३ (NFSA) अंतर्गत समावेश असणाऱ्या सुमारे ८० कोटी लाभार्थींना दरमहा माणसी ५ किलो मोफत धान्य वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. आधीच्या ‘प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने (पीएम -जीकेवाय)’च्या धर्तीवरच हे वाटप केले जाणार आहे.
सोलापूर शहरातील लसीचा साठा संपला, जवळपास 35 लसीकरण केंद्रे बंद #Vaccinestocks #Solapurcity #सोलापूरशहर #depleted #लसीकरण #लसीचासाठा #35vaccination #centers #closed #केंद्रे #बंद pic.twitter.com/xtSOjm06s2
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 24, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
'ऑक्सिजन एक्सप्रेस' नाशिकमध्ये दाखल https://t.co/MwStefBXHT
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 24, 2021
ग्राहक संरक्षण, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत सरकारने मे आणि जूनसाठी ‘प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना’ पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
या योजनेंतर्गत देशातील ८० कोटी लाभार्थ्यांना ५ किलो मोफत अन्नधान्य देण्यात येणार आहे. मोदी सरकार या कठीण काळात समाजातील प्रत्येक घटकाची सेवा करण्यास वचनबद्ध आहे.
'भारूडरत्न' निरंजन भाकरे यांचे कोरोनाने निधन https://t.co/vQSeDAEnJg
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 24, 2021
या विशेष योजनेअंतर्गत (PMGKAY) अंत्योदय अन्न योजना (AAY) आणि प्राधान्य गृहकर्मी (PHH) या दोन्ही प्रवर्गांतर्गत सुमारे ८० कोटी एनएफएसए लाभार्थ्यांना, एनएफएसएच्या दरमहा नियमित मिळणाऱ्या धान्याव्यक्तिरिक्त दरमहा माणसी ५ किलो अतिरिक्त मोफत धान्य (तांदूळ/गहू) देण्यात येणार आहे. अन्नधान्य अनुदान आणि आंतरराज्यीय वाहतुकीसाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना केंद्रीय सहाय्य केल्यामुळे केंद्र सरकार यासाठी २६,००० कोटींपेक्षा जास्त खर्च करणार आहे.