Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: दिलासादायक ! राज्यात मागील 24 तासात तब्बल 71 हजार 736 जण कोरोना मुक्त
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

दिलासादायक ! राज्यात मागील 24 तासात तब्बल 71 हजार 736 जण कोरोना मुक्त

Surajya Digital
Last updated: 2021/04/27 at 8:43 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : महाराष्ट्रात मागील 24 तासात कोरोनाचे 48,700 रूग्ण आढळले तर 524 जणांचा मृत्यू झाला. तसेच, आज तब्बल 71,736 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर सध्या 6,74,770 जणांवर उपचार सुरू आहेत. यासोबतच राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 43,43,727 झाली आहे. तर आतापर्यंत 65,284 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच, राज्यात आतापर्यंत 36,01,796 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्यात आज 71,736 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, राज्यात आजमितीस एकूण 36,01,796 कोरोना बाधित रुग्ण बरे झालेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण  82.92 टक्के एवढे झालेय. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,59,72,018 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 43,43,727 (16.72 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आलेत. सध्या राज्यात 39,78,420 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 30,398 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

https://twitter.com/SurajyaDigital/status/1386715576714731520?s=19

गेल्या काही दिवसांपासून मुंबईतही कोरोनाचा कहर पाहायला मिळत होता. मुंबईत आजही कोरोना रुग्णसंख्येत घट झालीय. आज एकूण कोरोना रुग्णसंख्या 4 हजारांखाली आलीय. 24 तासांत 3792 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मुंबईत गेल्या 24 तासांत 41 हजार चाचण्या झाल्याचीही माहिती मिळतेय.

https://twitter.com/SurajyaDigital/status/1386670146714955785?s=19

* मोठा दिलासा- राज्यात 6 दिवसात 4 लाख 42 हजार 466 रुग्ण कोरोनामुक्त

राज्यात कोरोना रुग्णांची वाढ होत असताना एक मोठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या सहा दिवसात राज्यभरात 4 लाख 42 हजार 466 रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. तर सोमवारी (26 एप्रिल) 71 हजार 736 रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यात सर्वाधिक 13 हजार 674 रुग्ण पुणे येथील आहेत. आरोग्यमंत्र्यांनी ही माहिती दिली.


* राज्यात दिवसभरात 5 लाख जणांचे लसीकरण; विक्रमी नोंद

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्रात आतापर्यंतची विक्रमी नोंद झाली आहे. सोमवारी (26 एप्रिल) सायंकाळी सहापर्यंत पाच लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली. 3 एप्रिल रोजी 4 लाख 62 हजार नागरिकांचे लसीकरण करून महाराष्ट्राने राष्ट्रीय विक्रम नोंदविला होता. आतापर्यंत महाराष्ट्रात सुमारे 1 कोटी 48 लाखांच्या आसपास लसीकरण झाले आहेत.

https://twitter.com/SurajyaDigital/status/1386710184198754311?s=19

You Might Also Like

हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा

मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!

विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत

अमली पदार्थास नकार, भावी पिढीस आकार

छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त विविध मान्यवरांकडून विनम्र अभिवादन

TAGGED: #Comfortable #24hours #71thousand736people #released #state, #राज्यात #24तासात #तब्बल #71हजार736 #कोरोनामुक्त
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article जोतिबा यात्रेवर कोरोनाचे सावट, मानकरी पॉझिटिव्ह आल्यामुळे आजची यात्रा रद्द
Next Article एमबीबीएस आणि एमडीच्या परीक्षा जूनच्या पहिल्या आठवड्यात

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?