Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: रोमहर्षक सामन्यात दिल्लीचा एका धावेनं पराभव, बंगळुरुचा विजय
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsखेळ

रोमहर्षक सामन्यात दिल्लीचा एका धावेनं पराभव, बंगळुरुचा विजय

Surajya Digital
Last updated: 2021/04/28 at 7:27 AM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

अहमदाबाद : आयपीएल 2021 मध्ये आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं दिल्लीचा अवघ्या एका धावेनं पराभव केला आहे. बंगळुरुनं प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 171 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सला निर्धारित 20 षटकात 170 धावाच करता आल्या. सामन्याच्या 20 व्या षटकात दिल्लीला 14 धावांची गरज होती. मात्र, दिल्लीच्या रिषभ पंतला या षटकात 13 धावाच बनवता आल्या.

Chin up, Rishabh Pant. Who better than Captain Kohli to tell you, it’s all a part of the learning. ❤️#PlayBold #WeAreChallengers #DCvRCB #IPL2021 pic.twitter.com/j10Iz3vBPk

— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) April 27, 2021

एबी डिव्हिलियर्सच्या फटकेबाजीमुळे बंगळुरुनं ५ बाद १७१ धावांचा डोंगर उभा केला अन् त्याचा पाठलाग करताना दिल्लीच्या फलंदाजांची दमछाक उडताना पाहायला मिळली होती. पण, दिल्ली कॅपिटल्सचे चार फलंदाज ४७ धावांत माघारी परतले होते. बंगळुरु सामन्याच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत विजयाच्या नजीक होते, परंतु हिमरोन हेटमायरनं सर्व गणित बिघडवले. त्यानं रिषभ पंतसह अर्धशतकी भागीदारीच केली नाही तर दिल्लीला विजयाच्या उंबरठ्यावर आणले. मात्र, अवघ्या एका धावेनं त्यांना हार मानावी लागली.

Winning by 1 run, we must talk about how this was an equally poised contest. But we’re glad we came on top. Cricket won again tonight! 🙌🏻

We move on to the next Challenge. 👊🏻#PlayBold #WeAreChallengers #IPL2021 #DCvRCB #DareToDream pic.twitter.com/71q396R8EE

— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) April 27, 2021

रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला साजेशी सुरुवात करता आली नाही. आवेश खाननं चौथ्या षटकात विराट कोहलीला ( १२) आणि इशांत शर्मानं पाचव्या षटकात देवदत्त पडीक्कलला ( १७) माघारी पाठवले. अमित मिश्रानं RCBला मोठा धक्का देताना ग्लेन मॅक्सवेलला ( २५) माघारी जाण्यास भाग पाडले. एबी डिव्हिलियर्स व रजत पाटिदार यांनी RCB (बंगळुरु) चा डाव सावरला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ३८ धावांत ५४ धावांची भागीदारी केली. पाटिदार २२ चेंडूंत २ षटकार मारून ३१ धावांवर माघारी परतला. एबीनं २०व्या षटकात २३ धावा कुटल्या. तो ४२ चेंडूंत ३ चौकार व ५ षटकारांसह ७५ धावांवर नाबाद राहिला. RCBनं ५ बाद १७१ धावा केल्या.

https://twitter.com/DelhiCapitals11/status/1387104202615259140?s=19

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

प्रत्युत्तरात दिल्लीला झटपट धक्के बसले. धावफलकावर २३ धावा असताना शिखर धवन ( ६) माघारी परतला अन् त्यानंतर स्टीव्ह स्मिथ ( ४) माघारी परतला. त्यामुळे दिल्लीला २८ धावांत दोन धक्के बसले होते. ७व्या षटकात वॉशिंग्टन सुंदरनं दिल्लीचा कर्णधार रिषभ पंत याच्यासाठी LBWची अपील केली अन् मैदानावरील अम्पायरनी त्याला बाद ठरवले. पण, रिषभनं DRS घेतला तेव्हा चेंडू पॅडवर आदळण्यापूर्वी बॅटला लागला होता आणि त्यामुळे मैदानावरील अम्पायरना त्यांचा निर्णय बदलावा लागला. पण, खेळपट्टीवर तग धरून बसलेला पृथ्वी शॉ ८व्या षटकात माघारी परतला. हर्षल पटेलनं RCBला ही महत्त्वपूर्ण विकेट मिळवून दिली. वाईड जाणारा चेंडू मारण्याच्या प्रयत्नात पृथ्वी ( २१) बाद झाला.

पंतप्रधान मोदींच्या काकू नर्मदाबेन यांचे कोरोनाने निधन https://t.co/DbBaR8xJHq

— Surajya Digital (@SurajyaDigital) April 27, 2021

मार्कस स्टॉयनिस व रिषभ यांनी फटकेबाजी करताना DC (दिल्ली) चा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी ३४ चेंडूंत ४५ धावा जोडल्या, परंतु हर्षलनं १३व्या षटकात स्टॉयनिसला ( २२) माघारी पाठवले. इथून दिल्लीसाठी शिमरोन हेटमायर किंवा रिषभ यांच्याकडून एबी डिव्हिलियर्ससारख्या फटकेबाजीची अपेक्षा होती. १६व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर देवदत्त पडिक्कलनं DC च्या हेटमायरचा झेल सोडला. अखेरच्या २४ चेंडूंत दिल्लीला विजयासाठी ५६ धावा हव्या होत्या. १७व्या षटकात हेटमायरनं ३ षटकारांसह २१ धावा चोपून धावा व चेंडूंचं अंतर २५-१२ असं कमी केलं. त्या २१ धावांमुळे कायले जेमिन्सनच्या नावावर चार षटकांत ३२ धावा कुटल्या गेल्या.

ऑक्सीजनसाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ब्रेट लीने भारताला दिले 44 लाख रुपये, पॅट कमिन्सने दिले 37 लाख https://t.co/eRc4w4Ay1Q

— Surajya Digital (@SurajyaDigital) April 27, 2021

हेटमायरनं २३ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. १९व्या षटकात ११ धावा आल्यानं दिल्लीला अखेरच्या षटकात १४ धावांची गरज होती. हर्षल पटेलनं ३७ धावांत २ विकेट्स घेतल्या. आता सर्व मदार मोहम्मद सिराजच्या खांद्यावर होती. सिराजनं पहिल्या तीन चेंडूंत फक्त दोनच धावा दिल्या. चौथ्या चेंडूवर दोन धावा आल्या अन् रिषभनं अर्धशतक पूर्ण केलं. पाचव्या चेंडूवर नशीबानं दिल्लीला एक चौकार मिळाला अन् अखेरच्या चेंडूवर सहा धावांची गरज होती. पण, रिषभला चौकार मारता आला. शिमरोन २५ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांसह ५३ धावांवर नाबाद राहिला. रिषभ ४८ चेंडूंत ५८ धावांवर नाबाद राहिला. दिल्लीनं १ धावेनं सामना गमावला. त्यांना ४ बाद १७० धावांवर समाधान मानावे लागले.

आयपीएल : पंतप्रधान क्रिकेटर्सना म्हणाले, चार्टर्ड विमान वगैरे काही मिळणार नाही… ऑस्ट्रेलिया संघाचा दौरा नाहीय, खेळाडू आपल्या वैयक्तिक करारानुसार स्पर्धा खेळण्यासाठी गेलेतhttps://t.co/kYpffAwkSb

— Surajya Digital (@SurajyaDigital) April 27, 2021

You Might Also Like

शुभमन गिलने गावस्कर आणि सोबर्सचे विक्रम मोडले

धोनीने मित्रांबरोबर साजरा केला ४४ वा वाढदिवस

विराट कोहलीचा पुतण्या क्रिकेटच्या मैदानात

जसप्रीत बुमराह लॉर्ड्स कसोटी सामन्यात खेळणार – शुभमन गिल

भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंग होणार सरकारी अधिकारी

TAGGED: #Delhi #beat #Bangalore #onerun #thrilling #match #Bangalore #wins, #रोमहर्षक #सामन्यात #दिल्लीचा #एकाधावेनं #पराभव #बंगळुरुचा #विजय
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पंतप्रधान मोदींच्या काकू नर्मदाबेन यांचे कोरोनाने निधन
Next Article मुंब्रा येथील रुग्णालयात रात्री भयंकर आग, 4 रुग्णांचा मृत्यू

Latest News

माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी शिवसेनेची ताकद उभी करावी; उद्धव ठाकरेंकडे मागणी
महाराष्ट्र August 2, 2025
कृषी विभागाने शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून लोकाभिमुख काम करावे – कृषीमंत्री
महाराष्ट्र August 2, 2025
होटगी रोड विमानतळावर पूर्वीपासूनच नाईट लँडिंग
सोलापूर August 2, 2025
सोलापूर – ई-पीक पाहणी केली तरच मदत मिळणार
सोलापूर August 2, 2025
कांद्याला निर्यात अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी
महाराष्ट्र August 2, 2025
कर्नाटक : माजी खासदार प्रज्वल रेवन्ना यांना जन्मठेप
Top News August 2, 2025
विद्यार्थ्यांनी डॉ. आंबेडकरांचे विचार अंगीकारत ध्येय गाठावे – भूषण गवई
महाराष्ट्र August 2, 2025
शेतकरी क्रांती संघटनेचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत विलय
देश - विदेश August 2, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?