नवी दिल्ली : दिल्लीच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने (सीएसआयआर) संपूर्ण देशात सेरो सर्वेक्षण केले. यानुसार, ‘ओ’ रक्तगट असलेल्या व्यक्तींना कोरोना होण्याचा धोका कमी असल्याचे दिसून आले. मात्र, वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, या अभ्यासाला शास्त्रीय पुरावा नसून, हे केवळ निरीक्षण आहे. दरम्यान, देशातील किती व्यक्तींच्या शरीरात प्रतिपिंड आहेत, याची चाचपणी करण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले होते.
मुंब्रा येथील रुग्णालयात रात्री भयंकर आग, 4 रुग्णांचा मृत्यू, चौकशीचे आदेश, 5 लाखांची मदतhttps://t.co/S8N2yL6S90
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 28, 2021
कोरोनाविरोधात रोगप्रतिकारकक्षमता वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते’, असेही संशोधकांनी या प्रकरणी म्हटले आहे. ‘ओ’ रक्तगट असणाऱ्या लोकांना संसर्गाचा धोका कमी आहे. डॉ रंजीत केणी यांनी काेराेनाप्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे आणि सुरक्षित राहणे गरजेचे आहे असा सल्ला दिला आहे. अनेक संस्थांमध्ये असे अशा स्वरूपाचे सर्वेक्षण, अहवाल समोर येत असतात. मात्र हे सर्व निरीक्षणांचा भाग आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांनी यावर अवलंबून न राहता स्वत:ची काळजी घेणे आवश्यक असल्याचे डॉ केणी यांनी सांगितले.
रोमहर्षक सामन्यात दिल्लीचा एका धावेनं पराभव, बंगळुरुचा विजय https://t.co/vV1rGMXK1R
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 28, 2021
तसेच ‘बी’ व ‘एबी’ रक्तगट असणाऱ्यांच्या बाबतीत ही जोखीम सर्वाधिक आहे’, असेही शास्त्रज्ञांनी आपल्या निष्कर्षांत म्हटले आहे. दरम्यान, हे सर्वेक्षण 140 वैज्ञानिक व डॉक्टरांनी केले. त्यात शहरी व निमशहरी केंद्रांतील ‘सीएसआयआर’च्या 40 हून अधिक प्रयोगशाळांत काम करणाऱ्या 10,427 प्रौढ व त्यांच्या कुटुंबीयांच्या सदस्यांचे आकलन करण्यात आले.
राज्यात कडक निर्बंध दहा दिवस वाढणार, आज होणार बैठकीत निर्णय #lockdown #लॉकडाऊन #maharashtra #कडकनिर्बंध #surajyadigital #TENDAYs pic.twitter.com/3RzWrBZRM2
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 28, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कोरोनापासून बचाव करण्याची क्षमता किती लोकांमध्ये आहे हे तपासण्यासाठी दिल्लीच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने (सीएसआयआर) संपूर्ण देशात सर्वेक्षण केले. त्यामध्ये ओ रक्तगट असलेल्या व्यक्तींना कोरोनाचा धोका कमी असल्याचे समोर आले. परंतु हे केवळ निरीक्षण आहे. याला कोणताही शास्त्रीय आधार नाही असे काही वैद्यकीय तज्ञांचे मत आहे.
राज्यातील बारावीच्या परीक्षेसंदर्भात मोठा निर्णय https://t.co/G5a64roQAg
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 28, 2021
देशभरात 40 हून अधिक सीएसआयआरची केंद्रे आहेत. त्यामध्ये केंद्रांमध्ये 10 हजार व्यक्ती आणि त्यांच्या कुटुबांतील सदस्यांना तपशील घेण्यात आला. सीएसआयआरचे 140 शास्त्रज्ञ आणि चिकित्सक सर्वेक्षण प्रक्रियेचा भाग होते. सर्वेक्षणानुसार, ओ रक्तगटाच्या व्यक्तींना कोरोनाचा धोका कमी असतो, तर बी आणि एबी रक्तगटाच्या व्यक्तींना काेराेनाचा जास्त धोका असतो. मात्र, काही वैद्यकीय तज्ञांनी हे केवळ निरीक्षण आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. असे म्हंटले आहे.
काँग्रेसचे दिग्गज नेते एकनाथ गायकवाड यांचे निधन, मंत्री वर्षा गायकवाडांना पितृशोकhttps://t.co/Q5o4IVQVXL
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 28, 2021
या निरीक्षणसंदर्भात बोलताना इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले की, हे केवळ निरीक्षण आहे. 10 हजार 714 नागरिकांचे सर्वेक्षण करून हे निरीक्षण नाेंदविले. परंतु, त्याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. सध्या कोरोनाची रुग्णसंख्या स्थिरावत आहेत. त्यामुळे पुढील काही दिवस महत्त्वाचे आहे. नागरिकांनी मास्कचा वापर, स्वच्छता, शारीरिक अंतर पाळणे गरजेचे आहे.
मुंबईत 18 ते 44 वयोगटासाठी लस विकतच घ्यावी लागणार https://t.co/ayjrNBppTT
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 28, 2021