बार्शी : राज्याला पहिल्या महिला आयएफएस अधिकारी देण्याचा मान बार्शी तालुक्याला मिळाला असून तालुक्यातील वैराग हे सासर असणार्या सुवर्णा रविंद्र माने-झोळ यांची वनविभागात राज्य वनसेवेतून केंद्रीय सेवेत (आयएफएस) पदोन्नती झाली आहे.
सर्वांना मोफत कोरोना लस, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; मात्र मे महिन्याच्या शेवटी लसीकरण सुरू होणार https://t.co/Sv9pKKCLZD
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 28, 2021
पदोन्नतीनंतर त्यांची नियुक्ती उपवनसंरक्षक (प्रादेशिक) या पदावर अहमदनगर येथे झाली आहे. त्यांच्या या पदोन्नतीबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राज्यातील वन विभागातील वनरक्षक, वनपाल, वनक्षेत्रपाल अशा अनेक पदांवर यापुर्वी महिलांनी काम केले आहे. परंतू राज्यसेवेतून आयएफएस होणार्या त्या पहिल्या महिला आहेत. त्यांची 2016 च्या भारतीय वनसेवेच्या तुकडीत नियुक्ती झाली आहे.
'ओ' रक्तगटास कोरोनाचा धोका कमी, हे केवळ निरीक्षण; शास्त्रीय पुरावा नाही https://t.co/56nC0D46VJ
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 28, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सुवर्णा माने या मूळच्या करमाळा तालुक्यातील वाशिंबे या गावच्या असून त्यांचे पती रविंद्र माने हे सध्या प्रभारी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी या पदावर सोलापूर येथे कार्यरत आहेत. सुवर्णा माने यांची 2009 मध्ये थेट सहाय्यक वनसंरक्षक या वर्ग 1 च्या पदावर सरळ सेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत निवड झाली होती. त्यावेळी पहिल्यांदाच सहाय्यक वनसंरक्षक या वर्ग 1 च्या पदावर 8 महिलां व 25 पुरुषांची नियुक्ती केली गेली.
काँग्रेसचे दिग्गज नेते एकनाथ गायकवाड यांचे निधन, मंत्री वर्षा गायकवाडांना पितृशोकhttps://t.co/Q5o4IVQVXL
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 28, 2021
आज त्या तुकडीचे 6 अधिकारी भारतीय वनसेवेत दाखल झाले असून त्यापैकी सुवर्णा माने या एकमेव महिला आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (यूपीएससी) भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) भारतीय पोलिस सेवा व( आयपीएस)भारतीय वन सेवा या तीन अखिल भारतीय सेवेमध्ये सरळसेवेने व राज्यसेवेतून पदोन्नतीने अधिकार्यांची नियुक्ती होते. त्यात भारतीय वनसेवेत सुवर्णा माने यांची निवड झाली असून त्यांचा समावेश 2016 च्या तुकडीमध्ये करण्यात आला आहे.
मुंब्रा येथील रुग्णालयात रात्री भयंकर आग, 4 रुग्णांचा मृत्यू, चौकशीचे आदेश, 5 लाखांची मदतhttps://t.co/S8N2yL6S90
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 28, 2021