Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: राजीव सातव यांची प्रकृती गंभीर; डॉक्टरांची टीम पुण्याला जाऊन उपचार करणार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

राजीव सातव यांची प्रकृती गंभीर; डॉक्टरांची टीम पुण्याला जाऊन उपचार करणार

Surajya Digital
Last updated: 2021/04/29 at 8:32 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

पुणे : कोरोनाची लागण झालेले काँग्रेसचे महाराष्ट्रातील मोठे नेते आणि राज्यसभा खासदार राजीव सातव यांची प्रकृती गंभीर आहे. राजीव सातव यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना पुण्यातून मुंबईत शिफ्ट करणार असल्याचे म्हटले जात होते. मात्र सातव यांच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयामधील डॉक्टरांची टीम पुण्याला जाऊन उपचार करणार आहेत.

कोरोनामुळे राजीव सातव यांची तब्येत खालावली
फोनवरुन राहुल गांधींकडून विचारपूस
कोरोनाबाधित काँग्रेस खासदार राजीव सातव यांच्यावर उपचार करण्यासाठी लीलावती रुग्णालयामधील डॉक्टरांची टीम पुण्याला जाणार#rajivsatav #COVID19 pic.twitter.com/qBIB7sJiMh

— Shailaja Shashikant Jogal (शैलजा शशिकांत जोगल) (@jogalshailaja) April 29, 2021

कोरोनाबाधीत झाल्यामुळे काँग्रेस पक्षाचे गुजरात प्रभारी आणि राज्यसभा खासदार राजीव सातव यांच्यावर पुण्याच्या जहांगीर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पण सातव यांची प्रकृती आणखी खालावल्यामुळे त्यांच्यावर उपचार करण्यासाठी मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलची एक टीम पुण्यात येत आहे.

संपूर्ण देशात लॉकडाऊन केल्यास महागाई वाढेल; आरबीआयचा इशारा https://t.co/3SrmUw4yhe

— Surajya Digital (@SurajyaDigital) April 28, 2021

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

सातव हे राहुल गांधींचे विश्वासू आणि गांधी घराण्याचे निष्ठावान समजले जातात. मागच्या वर्षी काँग्रेसचे राज्यसभा खासदार आणि हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे सल्लागार अहमद पटेल यांचे कोरोनामुळे निधन झाले. यानंतर राजीव सातव यांचे गुजरातच्या राजकारणातील महत्त्व वाढले. सातव २०१४ च्या मोदी लाटेत हिंगोलीमधून लोकसभेवर निवडून आले होते. पण २०१९ मध्ये पराभूत झाल्यानंतर त्यांना राज्यसभेत पाठवण्यात आले.

राजीव सातव यांची प्रकृती खालावल्याची माहिती मिळताच राहुल गांधी यांनी फोन करुन चौकशी केली. सध्या राज्यमंत्री विश्वजीत कदम सातव यांच्यासोबत आहेत. राजीव सातव यांना मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करावे आणि तिथेच पुढील उपचार करावे अशी आधीची योजना होती. पण सातव यांची प्रकृती आणखी खालावल्यामुळे मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलची एक टीम पुण्यात बोलावण्याचा निर्णय झाला. ही टीम तपासणी करुन जहांगीर हॉस्पिटलच्या टीमच्या सोबतीने सातव यांच्यावर पुढील उपचार करेल.

राज्यातील पहिल्या महिला आयएफएस अधिकारी बार्शीच्या स्नुषा, सुवर्णा रविंद्र माने-झोळ यांची भारतीय वनसेवेत पदोन्नती https://t.co/XpyIA7P6wp

— Surajya Digital (@SurajyaDigital) April 28, 2021

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

TAGGED: #RajivSatav #critical #condition #team #doctors #Pune #treatment, #राजीवसातव #प्रकृती #गंभीर #डॉक्टरांची #टीम #पुण्याला #उपचारकरणार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article #ayushmankhurana सीएम कोव्हिड 19 रिलीफ फंडमध्ये अभिनेता आयुषमानची मदत
Next Article मोदींचा मोठा निर्णय; ऑक्सिजनची चिंता मिटणार

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?