सोलापूर : विरोधी पक्षांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर उजनी पाणी प्रश्नावरुन आधीच हल्लाबोल केला आहे. त्यापाठोपाठ आता सत्ताधारी
मित्रपक्ष काँग्रेसनेही भरणे यांना ‘याद राखा’ असा इशारा दिला आहे. भरणे यांच्या ऐवजी सोलापूरचं पालकमंत्री पद आमदार प्रणिती शिंदे यांना द्यावे अशी आग्रही मागणीही आज काँग्रेसने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केले.
कष्टाने मुलाला केले इंजिनियर, लग्नही ठरले; मात्र कोरोनाने पोटचा मुलगा हिरावला https://t.co/HID2llVbi7
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 29, 2021
उजनी धरणातील पाणी वाटपावरून आधीच मराठवाडा विरुद्ध सोलापूर यांच्यात रणकंदन सुरू असतानाच, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उजनी धरणातील पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्याला देण्याची प्रशासकीय मान्यता मिळवून दिली आहे. त्यामुळे आणखी एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. आता उजनी पाणी प्रश्नावरून सोलापूर काँग्रेस शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी राष्ट्रवादीचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे जोरदार निशाणा साधला आहे.
पालकमंत्र्यांनी सोलापूरच्या नादाला लागू नये, ब्रिटिशांविरुद्ध लढा दिलेला सोलापूर अन्याय खपवून घेत नाही याची जाण ठेवावी अशी बोचरी टीका काँग्रेस शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर केली आहे.
उजनीतून पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्यातील 22 गावांना देण्याचा निर्णय झाल्यानंतर सर्व लोकप्रतिनिधी त्या निर्णयाला विरोध करीत असतानाच काँग्रेसचे पदाधिकारी मात्र, आमदार प्रणिती शिंदे यांना पालकमंत्री करण्याची मागणी करीत आहेत, याचे राजकीय वर्तृळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
उजनी पाणी प्रश्नावरून सोलापूरकर रस्त्यावर उतरतील आणि त्यांच्यासोबत काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता पालकमंत्र्यांच्या या चुकीच्या निर्णयामुळे रस्त्यावर उतरून सामना करेल तसे तर असे काही घडणार नाही, असे मला वाटते पण काही घडल्यास पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना जिल्ह्यात प्रवेश करू देणार नाही, असे खळबळजनक वक्तव्य यावेळी प्रकाश वाले यांनी केले.
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या भूमिकेविषयी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह विविध राजकीय पक्षांनी देखील इंदापूरला पाणी देण्यास विरोध दर्शवला आहे. त्यामुळे उजनीच्या पाण्यावरून सोलापूर विरुद्ध इंदापूर असा नवा वाद पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
* प्रणिती शिंदेंना पालकमंत्री करण्याची मागणी
विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात वर्षानुवर्षे विरोधात असलेली शिवसेना कॉंग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेली आणि राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्या वेळी सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली होती.
लग्नात घुसून गुंडगिरी; जिल्हाधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई, व्हिडिओ – लग्नात घुसला कलेक्टर, पंडितला व नवरदेवाला मारहाणhttps://t.co/JRgeQrdHPW
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 29, 2021
त्यानंतर काँग्रेसच्या सहकार्यातून भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात महाविकास आघाडीला यश आले. तेव्हापासून काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून आमदार प्रणिती शिंदे यांना मंत्रिपद द्यावे अथवा पालकमंत्री करावे, अशी मागणी होत आहे. आता उजनीच्या पाण्यावरून सर्वजण चिंतेत असताना काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र, आमदार प्रणिती शिंदे यांना पालकमंत्री करावे, अशी मागणी लावून धरली आहे.
सोलापुरात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक, 57 हजार 825 जणांनी केली कोरोनावर मात https://t.co/CremVpY5B5
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 29, 2021
* दोनदा पालकमंत्री बदलले, तिस-या पालकमंत्र्यांचे इंदापूरलाच प्राधान्य
जिल्ह्याचे पालकमंत्री दोनदा बदलले आणि तिसऱ्यावेळी दत्तात्रय भरणे यांच्या खांद्यावर धुरा सोपविण्यात आली. जिल्ह्यात धनगर समाज लक्षणीय असल्याने त्याचा फायदा पक्षाला होईल, असा अंदाज राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बांधला आणि त्यांना पालकमंत्रिपद दिले. प्रारंभी ते फोन उचलत नसल्याचा आरोप शिवसेना, काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांनी केला. त्यानंतर इंदापूरलाच प्राधान्य देणाऱ्या भरणे यांनी सोलापूरकडे लक्ष द्यायला सुरवात केली आणि नाराजांशी समझोता केला. आता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर तो रोखण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे लढा देण्याची गरज आहे. मात्र, बैठकीला बोलावले नाही म्हणून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी त्यांना बदलण्याचीच मागणी केली. तर काहीजणांनी त्यांच्या प्रदेशाध्यक्षांकडेही तशी मागणी केल्याची चर्चा आहे.
नवरदेव कोरोना पॉझिटिव्ह, नवरा- नवरीने पीपीई कीट घालून केले लग्न, पहा व्हिडिओ https://t.co/U4FEOKJnWK
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 27, 2021