मुंबई : महाराष्ट्रात लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. त्यानुसार आता 15 मेपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार आहे. यासंबंधीचा अधिकृत आदेश आज जारी करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा सोडून इतर सेवांवर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारीच महाराष्ट्रात लॉकडाऊन वाढणार, हे स्पष्ट केले होते. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी हे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले.
When you…
😷 Mask up
👐🏼 Sanitise your hands
↔️ Maintain a distance
💉 Register to get vaccinated
… You do your bit to stop the spread of the COVID-19 virus.Here’s a reminder to keep at it, till we crush the curve 💪 pic.twitter.com/gWL1NEIRBp
— Google India (@GoogleIndia) April 29, 2021
राज्यातील लॉकडाऊन पुन्हा एकदा वाढवण्यात आलाय. ब्रेक दि चेन अंतर्गत राज्यातील कडक निर्बंध 15 मेपर्यंत वाढविले असून, राज्यात 15 मेपर्यंत संचारबंदी राहणार आहे. प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर उपाय म्हणून आपत्कालीन उपाययोजना करणे आवश्यक आहे.
राज्यात लॉकडाऊन वाढणार, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कालच म्हटले होते. लॉकडाऊन वाढणार, हे जवळपास निश्चित झाले होते, मात्र तो किती दिवस वाढवायचा, यासंदर्भातील निर्णय झाला नसल्याचे टोपे यांनी सांगितले होते. मंत्रिमंडळाची काल बैठक झाली. या बैठकीनंतर टोपे यांनी ही माहिती दिली होती . मंत्रिमंडळाच्या बैठकीत लॉकडाऊनवरही चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले होते. तो आज लॉकडाऊन पंधरा दिवसांपर्यंत वाढवला आहे.
मोफत लसीकरणावरुन ठाकरे सरकार पडले तोंडघशी – भाजप https://t.co/e25xJWigQY
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 29, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर उपाय म्हणून आपत्कालीन उपाययोजना करणे आवश्यक आहेत, असंही राज्य सरकारनं आदेशात म्हटलं आहे. आता लॉकडाऊन 1 मे रोजी सकाळी 7 वाजल्यापासून 15 मे रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत राहणार आहे. नियमावलीनुसार 15 मेपर्यंतच्या लॉकडाऊन काळात मुंबईत लोकल रेल्वेतून प्रवासाची मुभा केवळ सरकारी कर्मचाऱ्यांना असेल.
सोलापुरातील घटना, कष्टाने मुलाला केले इंजिनियर, लग्नही ठरले; मात्र कोरोनाने पोटचा मुलगा हिरावला https://t.co/HID2llVbi7
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 29, 2021
सर्व सरकारी कार्यालयांमध्ये केवळ 15 टक्के कर्मचारी हजर राहू शकणार आहेत. यात केवळ कोरोना नियंत्रणातील अत्यावश्यक सेवेला सूट देण्यात आलीय. सामान्यांना मेट्रो, मोनो आणि लोकल प्रवास पूर्णतः बंद असेल.
सर्वसामान्यांचा विनाकारण प्रवास बंद केला असून, फक्त अत्यावश्यक कारणांसाठीच घराबाहेर पडता येणार आहेत. इतर सर्व कार्यालयांमध्ये 5 कर्मचारी किंवा 15 टक्के कर्मचाऱ्यांनाच हजर राहता येणार आहे. अत्यावश्यक सेवेतील कार्यालयांमध्ये 50 टक्के कर्मचाऱ्यांना काम करता येणार आहे. मात्र, आवश्यकतेनुसार या ठिकाणी 100 टक्क्यांपर्यंत कर्मचारी वाढवता येणार आहेत. लग्नासाठी एका हॉलमध्ये 25 माणसांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आलीय, परंतु त्यासाठी फक्त 2 तासांची वेळमर्यादा दिलेली आहे. तसेच नियमांचं उल्लंघन झाल्यास 50 हजार रुपये दंडसुद्धा आकारण्यात येणार आहे. जिल्हा बंदीचा निर्णयही जाहीर करण्यात आलाय. खासगी वाहतुकीसाठी ड्रायव्हरसह फक्त 50 टक्के प्रवाशांना परवानगी देण्यात आलीय, नियमांचं उल्लंघन झाल्यास 10 हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.
उजनीचे पाणी : सत्ताधारी मित्रपक्षानेच दिला पालकमंत्र्यांना इशारा; 'याद राखा, नादाला लागू नका' , सोलापूर विरुद्ध इंदापूर असा नवा वाद पेटण्याची चिन्हे https://t.co/aoVIZI9vGh
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 29, 2021
* अशी आहे कडक नियमावली
1. 1 मे रोजी सकाळी 7 वाजल्यापासून राज्यात कडक लॉकडाऊन
2. 15 मेच्या सकाळी 7 वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन
3. सामान्यांना मुंबई लोकल प्रवास पूर्ण बंद
4. सामान्यांसाठी मेट्रो, मोनो प्रवास बंद
5. राज्यात जिल्हा बंदी लागू
6. अत्यावश्यक कारणाशिवाय आंतरजिल्हा प्रवास बंद
7. सर्वसामान्यांच्या विनाकारण प्रवासावर बंदी
8. खासगी वाहतुकीला केवळ अत्यावश्यक कारणांसाठी परवानगी
9. सार्वजनिक वाहतूक 50% क्षमतेनं चालणार
10. एसटी बस वाहतूक 50% क्षमतेनं सुरू राहणार
11. अंत्यविधी, आजारपणासाठी प्रवासाची मुभा
12. खासगी वाहतूकदारांनी नियम मोडल्यास 10 हजार दंड
13. सरकारी कार्यालयांमध्ये 15% उपस्थिती
14. अत्यावश्यक सेवेतील सर्व कार्यालयं 15% हजेरीनं चालणार
15. लग्न समारंभासाठी 25 जणांना फक्त 2 तासांसाठी परवानगी
16. लग्नाचे नियम मोडल्यास 50 हजार दंड भरावा लागणार
17. बाहेरून येणाऱ्यांना 14 दिवस होम क्वारंटाईन करणार
18. होम क्वॉरंटाईन नागरिकांच्या हातावर शिक्का बंधनकारक
19. कोरोना संक्रमीत रुग्णांना संस्थात्मक विलगीकरणात पाठवणार
20. फक्त अत्यावश्यक कारणासाठीच घराबाहेर पडता येणार