सोलापूर : सोलापूर शहर – जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे. त्यामुळे अॉक्सिजनच्या मागणीतही वाढ होत आहे. त्यासाठी बेल्लारी, पुण्यावरून ऑक्सिजन आणला जात आहे. मात्र ऑक्सिजनअभावी रुग्णांचा जीव जाणार नाही, यादृष्टीने आता ग्रामीण रुग्णालये व उपजिल्हा रुग्णालयांमध्येच हवेतून ऑक्सिजन निर्माण करणारे दहा प्लांट उभारले जात आहेत.
करकंबच्या जि.प. शाळेत ५० बेडचे कोविड केअर सेंटर
https://t.co/KZmX0SMavp— Surajya Digital (@SurajyaDigital) April 30, 2021
जिल्ह्यातील उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांमध्ये नऊ तालुक्यांत ऑक्सिजन निर्मितीचे प्लांट उभारले जाणार आहेत. जिल्हाधिकारी व अप्पर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील महिन्यापर्यंत त्या ठिकाणी हे प्लांट कार्यान्वित होतील, असे डॉ. प्रदीप ढेले (जिल्हा शल्यचिकित्सक, सोलापूर) यांनी सांगितले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
'अशा' लोकांना कोरोना लसीचा एक डोस पुरेसा, महत्त्वपूर्ण संशोधन https://t.co/EY1hFvZQEt
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 30, 2021
सोलापूर जिल्हा प्रशासनाला वरिष्ठ पातळीवरुन निधी मिळालेला नाही. त्यामुळे आता जिल्हा नियोजन समितीतून ही कामे केली जात आहेत. सहा ते सात कोटींचा खर्च करून ऑक्सिजन निर्मितीचे प्लांट उभारले जाणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी दिली. हे प्लांट कायमस्वरूपी त्या ठिकाणी असतील, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. आगामी काळात आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याच्या दृष्टीने कोरोना काळात त्यावर विशेष लक्ष दिले जात असल्याचेही ते म्हणाले.
सोलापुरातील एसटी वाहक महिलेचा कोरोनामुळे मृत्यू https://t.co/NgD5SRQ93Y
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 30, 2021