नवी दिल्ली : लोकप्रिय न्यूज अँकर रोहित सरदाना यांचे आज निधन झालं. सरदाना हे आज तक या हिंदी वाहिनीवर सध्या कार्यरत होते. रोहित यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र त्याचवेळी त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, डॉ. कुमार विश्वास, वरिष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी रोहित यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
प्रसिद्ध न्यूज अँकर रोहित सरदाना यांचे कोरोनाने निधन #RohitSardana #RIP #surajyadigital #newsanchor #सुराज्यडिजिटल #coronavirus #death #कोरोना pic.twitter.com/kM2Y6D9rMW
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 30, 2021
आज तकचे अँकर रोहित सरदाना यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं आहे. त्यांच्यावर दिल्लीत करोनावर उपचार सुरू होते. पण याचदरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचं निधन झालं. टीव्ही जगतात रोहित सरदाना हे एक मोठं नाव होतं. त्यांनी आज तकसोबतच या अगोदर झी न्यूजसोबत प्राईम टाईम अँकर म्हणून काम केलं आहे. आज तकवर त्यांचा ‘दंगल’ हा कार्यक्रम लोकप्रिय होता.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* मृत्यूच्या एक दिवस आधी ते लोकांची मदत
रोहित सरदाना यांनी जगाचा निरोप घेतला असला तरी मृत्यूच्या एक दिवस आधी ते लोकांची मदत करत होते. कोरोनाची लागण झालेल्या नागरिकांच्या उपचारासाठी रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन, बेडच्या सोयीसाठी ते सोशल मीडियावर सक्रिय होते आणि सहकार्याचं आवाहन करत होते. इतकंच नाही तर २९ एप्रिललाही म्हणजे मृत्यूच्या एक दिवस आधी ट्वीट करुन त्यांनी एका महिलेसाठी रेमडेसिवीर इंजेक्शनची सोय करण्याचं आवाहन केलं होतं. त्याआधी २८ एप्रिल रोजी त्यांनी लोकांना प्लाझ्मा दान करण्याचं आवाहन केलं होतं.
More terrible news friends. Well known Tv news anchor Rohit Sardana has passed away. Had a heart attack this morning. Deep condolences to his family. RIP
— Rajdeep Sardesai (@sardesairajdeep) April 30, 2021
रोहित सरदाना यांच्या निधनावर वरिष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी ट्विटरवर लिहिलं आहे की, “अतिशय धक्कादायक बातमी आहे. प्रसिद्ध टीव्ही न्यूज अँकर रोहित सरदाना यांचं निधन झालं. आज सकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन.”
मुख्यमंत्री रात्री साडेआठ वाजता जनतेशी साधणार संवाद #CM #surajyadigital #संवाद #मुख्यमंत्री #सुराज्यडिजिटल #उद्धवठाकरे #ठाकरे #maharashtra pic.twitter.com/KiuoHyOMWp
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 30, 2021
* एकूण ६५ पत्रकारांचा मृत्यू
वार्तांकन करत असताना आतापर्यंत अनेक पत्रकारांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. देशात गेल्या एक वर्षात रोहित सरदाना यांच्यासह एकूण ६५ पत्रकारांचा मृत्यू झाला आहे. यातील ३२ पत्रकार फक्त २०२१ मधील चार महिन्यातच देशाने गमावले आहेत. उत्तर प्रदेश आणि तेलंगणातील सर्वाधिक पत्रकारांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील पत्रकार पांडुरंग रायकर यांचाही गेल्या वर्षी पुण्यात मृत्यू झाला होता.
याशिवाय महाराष्ट्रातही पत्रकारांचा कोरोनाने मृत्यू होत आहे. उस्मानाबाद येथील ज्येष्ठ पत्रकार विजय बेदमुथा ( वय ६७ ) यांचे हैद्राबाद येथे कोरोनाने निधन झाले. आठच दिवसापूर्वी त्यांचे मोठे बंधू पत्रकार मोतीचंद बेदमुथा ( वय ६९ ) यांचे कोरोनाने निधन झाले होते.
सोलापुरात दहा ठिकाणी उभारणार अॉक्सिजन प्लांट https://t.co/Yg75OZlTxZ
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 30, 2021