Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पाकिस्तान स्टँड्स विथ इंडिया ! हा कोण व्यक्ती जो दुचाकीवरुन रुग्णवाहिकेला सलाम करतोय ?
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
ब्लॉग

पाकिस्तान स्टँड्स विथ इंडिया ! हा कोण व्यक्ती जो दुचाकीवरुन रुग्णवाहिकेला सलाम करतोय ?

Surajya Digital
Last updated: 2021/05/01 at 9:12 AM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

टायटल वाचून चमकलात ना ! हा एक हॅश टॅग आहे जो काल पाकिस्तानमधला ट्विटर टॉप ट्रेंड होता. असो..
आधी या फोटोविषयी.
फोटो कराचीमधला आहे. २०१२ सालचा आहे.

फोटोत डाव्या बाजूला एक रुग्णवाहिका दिसत्येय. त्यात ड्रायव्हरच्या डाव्या बाजूस बसलेल्या व्यक्तीस रस्त्यावरून जाणारा एक दुचाकीचालक आपल्या गाडीचा वेग कमी करून आदराने सलाम करताना दिसतोय. कारण ती व्यक्ती होतीच तशी खास !

ती व्यक्ती म्हणजे चौऱ्याऐंशी वर्षीय अब्दुल सत्तार ईधी आहेत.
अब्दुल सत्तार ईधी यांची पाकिस्तानमधली सर्वात वेगवान आणि मोफत सेवा असणारी सर्वात जास्त व्याप्ती असणारी ईधी ऍम्ब्युलन्स सर्व्हिस विख्यात आहे.

भारतात कोरोनाने कहर केल्याने ईधींचे कुटुंबिय व्यथित झाले त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून मदत करण्याची इच्छा व्यक्त केली.
काही रुग्णवाहिका भेट म्हणून देण्याची इच्छा व्यक्त केली.

त्यांचे पत्र व्हायरल झाल्यानंतर तमाम पाकिस्तानी नेटकऱ्यांनी ‘पाकिस्तान स्टँड्स विथ इंडिया’ ! हा हॅश टॅग ट्विटरवर सुरु केला आणि अवघ्या काही तासात तो टॉपला गेला.

भारत आणि पाकिस्तानचे राजकारणी काय करू इच्छितात आणि त्यांची मजबुरी काय आहे यावर भाष्य करण्याची ही जागा नाही आणि वेळही नाही.

एक कट्टर दुष्मन समजल्या गेलेल्या देशातील लोकांनी आपल्या शेजारी देशात आलेल्या आपत्तीविषयी मानवतावादी दृष्टिकोनातून व्यक्त केलेल्या हृदय सृजन भावनांचा सन्मान स्वीकार व्हायला हवा, मला तर या भावना खूप आर्त वाटल्या.
कुणाला हे बालिश खुळचट वाटले तरी हरकत नाही.
असो…

‘प्रेयर्स फॉर इंडिया’ आणि ‘इंडिया निड्स ऑक्सिजन’ हे हॅश टॅग देखील पाकमध्ये ट्रेंडींग टॉपवर होते.

पाकिस्तानी लोकांनी खूप छान बोलकी मिम्स बनवून शेअर केलीत. निखळ शब्दात प्रेम व्यक्त केलंय.
पुनश्च असो..

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

२०१६ मध्ये अब्दुल सत्तार ईधी मरण पावले.
त्यांच्या गावी त्यांना सन्मानाने खाक ए सुपूर्द करण्यात आलं.
त्यांची अवयवदानाची अंतिम इच्छा होती मात्र मूत्रपिंडे निकामी झाल्याने त्यांचे निधन झालेलं असल्याने त्यांचे अनेक अवयव निकामी झाले होते त्यामुळे केवळ नेत्रदानच शक्य झाले.

आज अब्दुल सत्तार ईधी हयात नाहीत मात्र त्यांचे नेत्ररोपण ज्या व्यक्तीवर करण्यात आलं त्याच्या रूपातून पाहताना त्यांच्या वारसांनी जारी ठेवलेल्या मानवतावादी विचारधारेचा त्यांना सार्थ अभिमान वाटत असेल !

१९५० साली एका ऍम्ब्युलन्सने पाकिस्तानमध्ये मोफत सेवा सुरु करणारे अब्दुल सत्तार ईधी तिथले सेवाभावी नायक समजले जातात.
त्यांनी उभ्या केलेली अनाथ वसतीगृहे, मुक्या प्राण्यासाठीचे निवारे, बेघर व्यक्तींसाठी उभ्या केलेल्या वसाहती, शोषित व्यक्तींसाठी उभारलेली पुनर्वसन केंद्रे आजही पाकिस्तानी जनतेचे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

आपण ज्या नजरेने पाहू, जग आपल्याला तसेच दिसेल !

– समीर गायकवाड

You Might Also Like

गृहकलह… शरद पवारांचे वारसदार कोण  ?

राजकारणाचे उद्योग; उद्योगाचे राजकारण

आघाडीत बिघाडी… काँग्रेस-शिवसेनेच्या नव्या दोस्तीची सुरुवात

‘सततची तोंडपाटीलकी’ नडली… अदृश्य महाशक्ती सुद्धा तितक्याच ताकदीने काम करतीय

लगाम लावाच…आता नाही सहन होत…

TAGGED: #Pakistan #stands #withIndia! #Who #person #saluting #ambulance, #पाकिस्तान #स्टँड्स #विथ #इंडिया #कोणव्यक्ती #दुचाकीवरुन #रुग्णवाहिकेला #सलामकरतोय ?
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article राज्यात आणखी कडक लॉकडाऊनची वेळ आली नाही : मुख्यमंत्री
Next Article भरुचमध्ये कोविड सेंटरला भीषण आग; 18 रुग्णांचा मृत्यू

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?