अहमदाबाद : गुजरातच्या भरूच जिल्ह्यातील कोविड सेंटरमध्ये भयंकर दुर्घटना घडली. कोविड सेंटरला आग लागून 18 रुग्णांचा मृत्यू झाला. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास ही आग लागल्याचं समजतं. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. आगीचं नेमकं कारण समजू शकलं नाही.
It's an unfortunate incident not only for us but for entire Bharuch. With Police & admn's help, we could shift patients to other hospitals. 14 patients & 2 staff nurses lost their lives in the incident: Zuber Patel, trustee of the COVID care centre in Bharuch where fire broke out pic.twitter.com/O0Z3ClTXhv
— ANI (@ANI) May 1, 2021
गुजरातमधील भरुच येथील एका कोव्हिड रुग्णालयाला भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत 18 जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर अनेकजण गंभीर जखमी झाले. रात्री या दुर्घटनेत 18 जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर अनेकजण गंभीर जखमी झाले. पटेल वेलफेअर रुग्णालयात रात्री जवळपास 12.30 वाजता ही दुर्घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, भरुच जिल्ह्यातील पटेल रुग्णालयातील कोरोनाबाधितांसाठी कोव्हिड सेंटर सुरु करण्यात आले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या कोव्हिड सेंटरमधील आयसीयूमध्ये शॉटसर्किट झाल्याने आग लागली. रात्री 12 च्या सुमारास ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक रुग्ण हे गंभीर जखमी झाले आहे. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र- कामगार दिनाच्या शुभेच्छा, कोरोना काळात स्वतःची, परिवाराची घ्या काळजी, प्रगतीसाठी आपण महत्त्वाचे आहात #maharashtra #महाराष्ट्रदिन #MaharashtraDay #महाराष्ट्र #प्रगती #development #surajyadigital #IMPORTANT #कामगारदिन #labourday #Labour #कामगार #सुराज्यडिजिटल pic.twitter.com/WwTfa9FoUi
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 1, 2021
प्राथमिक माहितीनुसार, शॉटसर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती समोर येत आहे. यानंतर अग्निशमन दलाच्या मदतीने या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. तसेच या आगीत जखमी झालेल्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ही आग इतकी भीषण होती की, संपूर्ण आयसीयू वॉर्ड यात जळून खाक झाला. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
Gujarat: Fire broke out at a #COVID19 care centre in Bharuch last night. 16 people, including 14 patients, died in the incident. pic.twitter.com/gbbLZzML6I
— ANI (@ANI) May 1, 2021
दरम्यान सध्या अग्निशमन दलाचे जवान, पोलीस अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत. मात्र ही घटना नेमकी कधी घडली, आग कशी लागली, याची अजूनही कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सद्यस्थितीत या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना सिविल, सेवाश्रम, जंबूसर अल मेहमूद रुग्णालयांसह इतर खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
राज्यात आणखी कडक लॉकडाऊनची वेळ आली नाही, 18-44 वयोगटाचं लसीकरण पुरवठ्यानुसार सुरू करणारhttps://t.co/ouCQQKVRsE
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 30, 2021