सोलापूर : सोलापुरातील जुन्या काळातील ज्येष्ठ विधिज्ञ अरविंद गोपाळराव कुंभकोणी (वय 90) यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात भाऊ डॉक्टर अशोक कुंभकोणी, पत्नी शारदा, मुलगी अनुराधा तसेच मुलगा आशुतोष, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1388726959371218947?s=20
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
रेल्वे लाईन भागातील काळजापूर मारुती देवस्थानचे ते प्रमुख होते. महाराष्ट्र राज्याचे महा अभियोक्ता आशुतोष कुंभकोणी यांचे ते वडील होत. त्यांच्या पार्थिवावर दुपारी बारा वाजता मोदी स्मशानभूमीत अग्निसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यांच्या मृत्यूने विधिज्ञ क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1388732516429754369?s=20