कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी या सत्ता राखण्यात यशस्वी ठरत असल्याचं दिसत आहे. त्यानिमित्त राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तसेच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन केले आहे. ‘अभिनंदन बंगालची वाघीण… ओ दीदी दीदी ओ दीदी’, राऊत यांनी ट्विट केलं.
Congratulations Tigress of Bengal..
ओ दीदी,
दीदी ओ दीदी!
@MamataOfficial @derekobrienmp @MahuaMoitra pic.twitter.com/orDkTAuPr3— Sanjay Raut (@rautsanjay61) May 2, 2021
सलग दोन टर्म सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला यावेळी भाजपने जोरदार लढत दिली. भाजपच्या दिग्गज नेते यावेळी ममता बॅनर्जींविरोधात मैदानात उतरले होते. राज्यात 208 जागांसाठी 27 मार्च ते 29 एप्रिल या कालावधीत आठ टप्प्यांमध्ये मतदान घेण्यात आले. ममता बॅनर्जी हॅट्रिक करणार की भाजप सत्ता स्थापन करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं होतं. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत.
Congratulations @MamataOfficial on your stupendous victory!
Let us continue our work towards the welfare of people and tackling the Pandemic collectively.— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 2, 2021
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु असून सुरुवातीचे कल हाती आले आहेत. या कलांनुसार तृणमूल काँग्रेसने 200 जागांचा टप्पा पार केला आहे. तृणमूल काँग्रेस 208 जागांवर पुढे असून भाजपची आघाडी 80 जागांवर आली आहे. यानुसार राज्यात तृणमूल काँग्रेसची लाट कायम असून पुन्हा ममता बॅनर्जी विजयाची हॅटट्रिक करण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील ट्वीट करत पश्चिम बंगाल निवडणुकीतील विजयबद्दल ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन केले आहे.
ममता बॅनर्जी नंदीग्राममधून आता आघाडीवर #BangalElection2021 #MamataBanerjee #BengalElection2021 #surajyadigital #सुराज्यडिजिटल #ममताबॅनर्जी pic.twitter.com/p4JLFbuZWF
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 2, 2021
* नंदीग्राममधून ममता बॅनर्जी 3 हजार 372 मतांनी आघाडीवर
नंदीग्राममधून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा आघाडी घेतली आहे. ममता बॅनर्जी यांनी भाजप उमेदवार सुवेंदू अधिकारी यांना मागे टाकत 3 हजार 372 मतांची आघाडी घेतली आहे. दरम्यान, पश्चिम बंगालमधील ही सर्वात प्रतिष्ठेची लढत मानली जाते. भवानीपूर हा ममता बॅनर्जी यांचा पारंपारिक मतदारसंघ आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मात्र त्यांनी नंदीग्राममधून विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. भाजपचे नेते शुवेंदू अधिकारी यांनी 2016 मध्ये तृणमूलच्या तिकिटावर नंदीग्राममधून निवडणूक लढवली होती. मात्र, सुवेंदू अधिकारी यांच्यासह खासदार सुनील मंडल, माजी खासदार दशरथ तिर्की यांच्यासह 10 आमदारांनी निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यातील पाच आमदार तृणमूलचे होते.
नेटकरी म्हणतात, ममताच बंगालची दुर्गा, एकटीने करुन दाखवलं #durga #MamataBanerjee #surajyadigital #तृणमूलकाँग्रेस #सुराज्यडिजिटल #भाजपा #MamataDidi #BangalElection2021 pic.twitter.com/XLmS916IMo
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 2, 2021
* नेटकरी म्हणतात- ‘एकटीने करुन दाखवलं’, ‘ममताच बंगालची दुर्गा’
पश्चिम बंगालमध्ये कमळ फुलणार की पुन्हा तृणमूल काँग्रेस सत्तेत येणार हे आज समजणार आहे. मतमोजणीच्या आकडेवारीनुसार बंगालमध्ये तृणमूल सत्तेची हॅटट्रीक मारणार असल्याचं बोललं जात आहे. मतमोजणीचे आकडे समोर आल्यानंतर ममता बॅनर्जी यांच्यावर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला. ‘मोदी शहांना कशी टक्कर द्यावी हे शिकवलं’, एकट्या लढल्या, बंगाली लोकं दुर्गाची पूजा करतात.