कोल्हापूर : शिवसेनेला भाजपाने परत चांगली भावनिक साद घातली आहे. एरव्ही शिवसेनेच्या विरोधात भाष्य करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज मात्र शिवसेनेसोबत आम्ही एकत्र येऊन सरकार स्थापन करण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे. राज्याच्या हितासाठी आम्ही शिवसेनेसोबत एकञ यायला तयार आहोत, असे भाजपा प्रदेशाध्यक्षांनी म्हटली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल‘ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम‘वरही उपलब्ध
प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीत भाजपने स्वबळाचा नारा दिला होता. आजही त्या मुद्द्यावर चंद्रकांत पाटील ठाम होते. शिवसेना भाजपा स्वतंत्र लढू मात्र राज्याच्या हितासाठी आजही शिवसेनेसोबत आम्ही एकत्र येऊन सरकार स्थापन करण्यास तयार असल्याचं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.
दरम्यान, शिवसेना आणि भाजप जरी एकत्र आले तरी निवडणुका मात्र वेगवेगळ्या लढू अशा पद्धतीचा निर्धार देखील चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखवला. ते कोल्हापूरात बोलत होते. तसेच 80 व्या वर्षी शरद पवार हे महाराष्ट्रातभर फिरतात मात्र मुख्यमंत्री घरात बसतात… मग शरद पवारांनीचं मुख्यमंत्री व्हावं, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.
* शिवसेनेच्या प्रत्युत्तराची प्रतीक्षा
चंद्रकांत पाटील यांच्या विधानानंतर आता शिवसेना काय प्रत्युत्तर देते याकडे राज्याच्या नजरा लागल्या आहेत. दरम्यान, काल भाजपाची “राज्य कार्यकारीणीची बैठक झाली. या बैठकीला भाजपाअध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी संबोधित केले होते. तेव्हा महाराष्ट्रात सरकार आणण्याच्या तयारीला लागा, असा आदेश नड्डा यांनी दिसल्याचे वृत्त आहे. त्यानंतर आता प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीची झोप उडेल असे विधान केले आहे. यावर शिवसेना काय प्रतिउत्तर देणार हे पाहावे लागेल.