नवी दिल्ली : आयपीएलमध्ये आज कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना खेळला जाणार होता. परंतू आता हा सामना रद्द करण्यात आला आहे. कोलकाता नाईट रायडर्स टीमशी संबंधित काही सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे हा सामना रद्द करण्यात आला आहे. आज होणारी मॅच काही दिवसांनी नव्या वेळापत्रकानुसार खेळवली जाणार आहे.
राज्यात अवकाळी पावसाचं थैमान; वीज पडून ११ जणांचा मृत्यू https://t.co/WwL3YwkN4a
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 3, 2021
अखेर आयपीएलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. कोलकाता नाइट रायडर्स संघातील अनेक खेळाडू आजारी पडले आहेत. वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे आज कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर यांच्यात होणारा सामना पुढे ढकलण्यात आला आहे. आयपीएल वेळापत्रकानुसार हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज सायंकाळी साडेसात नियोजित होता. पण दोन खेळाडू पॉझिटिव्ह आल्याने आजच्या सामन्याचे वेळापत्रक बदलण्यात आल्याचे आयपीएलने अधिकृतरित्या स्पष्ट केले आहे.
BREAKING: Tonight’s #RCBvsKKR game has been postponed after a couple of KKR players tested positive. Details later #IPL2021
— Vikrant Gupta (@vikrantgupta73) May 3, 2021
वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर या दोन खेळाडूंनी स्वतःला आयसोलेट केले आहे. वैद्यकीय पथक त्यांच्या तब्येतीची काळजी घेत आहे. या खेळाडूंच्या जे कोणी संपर्कात आले आहेत त्यांचा शोध घेतला जात असल्याचे आयपीएल व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे.
तुमच्या जवळचे कोरोना लसीकरण केंद्र कोणते ? या whatsapp नंबरवर विचारा #coronavirus #Whatsapp_Number #vaccine #WhatsAppNo #विचारा #CoronaVaccine pic.twitter.com/oEaYoWKOXs
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 3, 2021
आर. अश्विनच्या घरातदेखील कोरोनाने शिरकाव केला आहे. याबाबत अश्विनची पत्नी प्रीती नारायणनने कुटुंबातील १० जणांना कोरोना झाल्याचे माहिती ट्विट करत दिली होती. या कारणामुळे अश्विनने आयपीएलमधून माघार घेतली आहे आणि कुटुंबाला प्राधान्य दिले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
याबाबत बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, केकेआरमधील दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे आरसीबी संघ त्यांच्याविरुद्ध आजचा सामना खेळण्यास उत्सुक नाही. यामुळे आजचा सामना पुढे ढकलण्यात आला आहे.
IPL 2021: Varun, Sandeep test positive for COVID-19, RCB wary of playing KKR on Monday night
Read @ANI Story | https://t.co/EbKvWGIy4A pic.twitter.com/k67swvyxsC
— ANI Digital (@ani_digital) May 3, 2021
यंदाच्या आयपीएल हंगामापूर्वीच दिल्ली कॅपिटल्सच्या अक्षर पटेलला कोरोनाची लागण झाली होती. कोलकाता नाइट रायडर्सचा फलंदाज नितीश राव याचादेखील अहवाल अगोदर पॉझिटिव्ह आला होता. पण स्पर्धा सुरु होण्यापूर्वी तो कोरोनामुक्त झाला. तसेच भारतात कोरोनाचा उद्रेक झाल्यामुळे ऑस्ट्रेलियाचे खेळाडू अॅंड्रू टाये, केन रिचर्डसन आणि अॅडम झांपा हे मायदेशी परतले आहेत. आयपीएलमध्ये सहभागी असलेल्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंना मायदेशात परतण्यासाठीची व्यवस्था त्यांना स्वत:च करावी लागेल, अशी स्पष्ट भूमिका ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी घेतली होती.
Official Announcement:
Today’s match between KKR and RCB has been postponed by the BCCI as per IPL Safety Guidelines after Varun Chakaravarthy and Sandeep Warrier tested positive for COVID.
We wish Varun and Sandeep a speedy recovery. 🙌🏻🙏🏻#PlayBold #IPL2021 #KKRvRCB pic.twitter.com/yctoffeW3C
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) May 3, 2021