मुंबई : पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेसची सत्ता आल्यानंतर मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरु आहे. भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या, घरांवर हल्ला, आग लावणे, लुटमारीच्या अनेक घटना घडत आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेवर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. बंगालमध्ये वाघीण जिंकली म्हणणारे हिंसाचाराच्या घटनेवर मुग गिळून गप्प आहेत, असे ते म्हणाले.
विचारांची लढाई विचारांनी लढली जावी,तिथे हिंसाचारास थारा नसावा! निवडणुकीनंतर बंगालमध्ये सुरू असलेला हिंसाचार अतिशय निंदनीय असून, हे थांबले पाहिजे!
बंगालमध्ये वाघीण जिंकली म्हणणारे, हिंसाचाराच्या घटनेवर मुग गिळून गप्प आहेत!
अशा घटनांचे समर्थन होऊ शकते का? #BengalBurning— Pravin Darekar – प्रविण दरेकर ( Modi Ka Parivar) (@mipravindarekar) May 4, 2021
पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर राज्यातील काही भागांमध्ये हिंसाचाराचा उद्रेक झाला आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये हिंचारा सुरु आहे. भाजपाने तृणमूल काँग्रेसचे समर्थक भाजपा समर्थकांच्या घरांवर आणि कार्यालयांवर हल्ले करत असल्याचा दावा केलाय. आमच्या ९ कार्यकर्त्यांचा या हिंचारात मृत्यू झाल्याचं भाजपाने म्हटलं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पहिल्यांदाच पंतप्रधानांनी शुभेच्छा देण्यासाठी फोन केला नाही – ममता बॅनर्जी https://t.co/diDihHOwsL
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 4, 2021
भाजपाबरोबरच डाव्या पक्षांनाही तृणमूल काँग्रेसवर हिंसाचाराचा आरोप केलाय. दरम्यान पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघातून खासदार असणाऱ्या परवेश साहिब सिंह यांनी पश्चिम बंगालमधील हिंसेच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया दिलीय. तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनाही दिल्लीत यावं लागतं हे लक्षात ठेवा, असा धमकी वजा इशारा सिंह यांनी ट्विटरवरुन दिलाय.
I dare TMC to use the word "Fascism" ever again for anyone else other than @MamataOfficial. Because this is what Fascism looks like in real.. pic.twitter.com/4OhVVAX96O
— Parvesh Sahib Singh ( Modi Ka Pariwar ) (@p_sahibsingh) May 4, 2021
पश्चिम बंगालमध्ये ममतांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या तृणमूल काँग्रेसला सलग तिसऱ्यांदा बहुमत मिळालं. दोन मे रोजी निकाल समोर आल्यानंतर कोलकातामधील भाजपाच्या कार्यालयाला आग लावण्यात आली. सोमवारीही राज्यातील काही भागांमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांना मारहाण करुन त्यांची हत्या करण्यात आल्याच्या बातम्या समोर येत आहे.
बंगाल में परिस्थितियाँ भयंकर है, भाजपा कार्यकर्ताओं की हत्या, महिलाओं का बलात्कार ,लोगों के घर तोड़े जा रहे है, ममता दीदी सब देखकर भी ख़ामोश है, इन घटनाओं के ख़िलाफ़ बंगाल भवन दिल्ली में प्रदर्शन द्वारा विरोध प्रकट किया। भाजपा चुप नहीं बैठने वाली ये नरसंहार को बंद करे बंगाल सरकार pic.twitter.com/0YtZGRTHPN
— Parvesh Sahib Singh ( Modi Ka Pariwar ) (@p_sahibsingh) May 4, 2021
“निवडणूक जिंकल्यानंतर तृणमूलच्या गुंडांनी आमच्या कार्यकर्त्यांचे जीव घेतले. भाजपा कार्यकर्त्यांच्या गाड्यांची त्यांनी तोडफोड केली. लक्षात ठेवा तृणमूलच्या खासदारांना, मुख्यमंत्र्यांना आणि आमदारांना दिल्लीतही यावं लागतं. याला इशारा समजा. निवडणुकीमध्ये पराभव आणि विजय होत असतात, हत्या होत नाहीत,” असं सिंह यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
१०० दिवसांची कोविड ड्युटी करणाऱ्यास सरकारी नोकरीत प्राधान्य https://t.co/P1S6L7c93b
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 4, 2021