अकलूज : रेमडेसिविर इंजेक्शनचा काळा बाजार करणाऱ्या संशयित आरोपींना अकलूज पोलिसांनी जेरबंद केले असून यामुळे अकलूज आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
बिग ब्रेकिंग – मराठा आरक्षण रद्द, सुप्रीम कोर्टाचा निर्णय https://t.co/YltUtxk1wB
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 5, 2021
अकलुज पोलीस स्टेशन हददीतील काही व्यक्ती स्वत : चे आर्थिक फायद्याकरीता रेमडेसिविर इंजेक्शनची बॉटल ( हायल ) अधिक चढ्या किंमतीने विक्री करुन त्या औषधाचा काळा बाजार करीत आहेत, अशी खात्रीशीर बातमी पोलीस निरीक्षक अरुण सुगांवकर यांना गुप्तबातमीदारामार्फत मिळाली होती.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
टिम तयार करुन पोलीस स्टाफ , औषध निरीक्षक सोलापूर व दोन पंचासह सापळा रचून डमी ग्राहक पाठविले असता आण्णासाहेब सुग्रीव किर्दकर (वय २८ वर्षे रा. चाकाटी लाखेवाडी ता . इंदापूर जि . पुणे), अजय महादेव जाधव (वय २३ वर्षे ) , कुमार महादेव जाधव (वय २१ वर्षे दोघे रा . संग्रामनगर ता . माळशिरस जि . सोलापूर ) यांनी रेमडेसिविरचा काळा बजार करत असल्याचे निष्पन्न झाले.
राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत घट – राजेश टोपे https://t.co/fFWO5aCrjP
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 4, 2021
परवाना नसताना छापील किंमतीपेक्षा ३५,००० रुपये अधिक दराने तसेच वैदयकिय अधिका – याच्या चिठ्ठीशिवाय व विना कोविड तपासणी अहवालाशिवाय अधिक किंमतीने विक्री करण्याकरिता त्यांच्याकडे आढळून आले. १०० फुटी बायपास रोडवरील अभय क्लिनीकजवळ विक्री करुन शासनाची फसवणुक करीत असताना मिळून आले.
आरोपींना अटक करण्यात आली असून उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा पुढील तपास पो . नि . अरुण सुगांवकर हे करीत आहेत .
“अकलूज पोलीस ठाणे हद्दीत कोणी रेमडेसिविर इंजेक्शनचा काळा बाजार करुन जास्त पैसे घेवून विक्री करत असतील तर नागरिकांनी तात्काळ ०२१८५/२२२१०० या क्रमांकावर कळवावे . त्यांचे नांव गोपनीय ठेवण्यात येईल तसेच सदर आरोपींना अटक करुन कडक कारवाई करण्यात येईल .
– अरुण सुगावाकर
पोलीस निरीक्षक , अकलूज पोलीस ठाणे