Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ‘रॅपिड अॅन्टीजन टेस्ट’चा निकाल चुकीचा येण्याची शक्यता; न्यायालयाने फटकारले
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

‘रॅपिड अॅन्टीजन टेस्ट’चा निकाल चुकीचा येण्याची शक्यता; न्यायालयाने फटकारले

Surajya Digital
Last updated: 2020/07/28 at 8:28 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

नवी दिल्ली : कोविड १९ च्या प्राथमिक चाचणीसाठी वादग्रस्त ‘रॅपिड अॅन्टीजन टेस्ट’चा अद्यापही का वापर केला जातोय? असा प्रश्न उच्च न्यायालयानं दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या सरकारला विचारलाय. ‘रॅपिड अॅन्टीजन टेस्ट’चा निकाल चुकीचा येण्याची शक्यता खूपच जास्त आहे. असं असूनही ही चाचणी पद्धत का वापरली जात आहे? असं म्हणत दिल्ली उच्च न्यायालयानं अरविंद केजरीवाल सरकारला धारेवर धरलं.

(तुमचे हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि टेलिग्रामवरही उपलब्ध)

‘भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद’ (आयसीएमआर) कडून देण्यात आलेल्या दिशा-निर्देशांचं सक्तीनं पालन करण्याचे आणि आपल्या मनमानी पद्धतीनं काम न करण्याचा सल्लाही उच्च न्यायालयानं अरविंद केजरीवाल सरकारला दिला आहे.

न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. दिल्लीत ज्या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणं आढळतं आहेत आहेत केवळ त्याच रुग्णांना RT/PCR चाचणी करण्याचा सल्ला दिला जात आहे. तसंच रिपोर्ट चुकीचा येण्याची शक्यता जास्त असलेल्या ‘रॅपिड एन्टीजन टेस्ट’चा वापर जास्तीत जास्त लोकांवर केला जात आहे. याकडेही न्यायालयानं लक्ष वेधलं. ICMR नं मात्र या पद्धतीनं चाचणी करण्यास सांगितलेलं नाही, असंही न्यायालयानं राज्य सरकारला खडसावलं आहे.

You Might Also Like

नीट-यूजी परीक्षेचा निकाल जाहीर

आशियाई जिम्नॅस्टिक्स चॅम्पियनशिप : प्रणती नायकने  पटकावले कांस्यपदक

आईला हृदयविकाराचा झटका आल्याने गौतम गंभीर परतला मायदेशी

विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियाचे खेळाडू काळी फित बांधून उतरले मैदानावर

शैक्षणिक संस्थांमधील रॅगिंग : यूजीसीची महाराष्ट्रातील ३, देशातील ८९ विद्यापीठांना नोटीस

TAGGED: #ॲन्टीजनरॕपिटटेस्ट #शक्यता #सरकार #न्यायालय #फटकारले
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कमॉडिटी बाजारात सोन्याचा भाव ५२ हजारांवर; सरकारने आयात शुल्क वाढवले
Next Article मुंबई – बंगळुरु हायवेलगत केदारवाडीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

Latest News

विद्यार्थ्यांचे परदेशी शिक्षणाचे स्वप्न आता भारतातच पूर्ण होणार : मुख्यमंत्री
महाराष्ट्र June 14, 2025
नीट-यूजी परीक्षेचा निकाल जाहीर
देश - विदेश June 14, 2025
सांगोला तालुक्यातील आरोग्याचे प्रलंबित प्रश्न सोडवा : दीपक साळुंखे
सोलापूर June 14, 2025
नोटरी करून एकाच जागेची अनेकांना विक्री
सोलापूर June 14, 2025
वारकर्‍यांची सेवा हीच पांडुरंगाची सेवा समजून काम करावे : प्रकाश आबिटकर
महाराष्ट्र June 14, 2025
सोलापूर – चंदनउटी पुजेतून मंदिर समितीला 35 लाखांचे उत्पन्न
सोलापूर June 14, 2025
आशियाई जिम्नॅस्टिक्स चॅम्पियनशिप : प्रणती नायकने  पटकावले कांस्यपदक
देश - विदेश June 14, 2025
आयएसएसएफ विश्वचषक २०२५ : सुरुची सिंगने १० मीटर एअर पिस्तूलमध्ये जिंकले सुवर्णपदक
महाराष्ट्र June 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?