सातारा : साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासह काँग्रेसच्या कार्यालयावर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली आहे. मराठा आरक्षण रद्द केल्याचा निषेधार्थ हे कृत्य केलं असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. यात कारमधून आलेल्या व्यक्ती दगडफेक करुन फरार झाल्या आहेत. दगडफेक तसेच शेन फेक करणाऱ्यांची धरपकड करण्यासाठी पोलिसांनी धावाधाव सुरू केली आहे.
बलात्कारप्रकरणी तुरुंगात असणाऱ्या आसारामला कोरोनाची लागण https://t.co/YeIl88v91A
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 6, 2021
सुप्रीम कोर्टाने बुधवारी मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मराठा आरक्षणासाठी झगडणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवरच आज गुरुवारी राष्ट्रवादी कार्यालयावर दगडफेक झाल्याचे समजते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मराठा आरक्षणासाठी 16 मेपासून पुन्हा मोर्चा, पुनर्विचार याचिका दाखल करणार https://t.co/wF0YNDEQSA
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 6, 2021
सरकारच्या विरोधात निषेधाच्या घोषणाही देण्यात आल्या. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या साताऱ्यातील निवासस्थाने देखील अज्ञातांनी शेण फेकले. पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोलिस फोर्स दाखल झाले. सातारा शहर पोलिसांकडून संबधित कारचा व हल्लेखोरांचा शोध सुरु आहे. दरम्यान, आ. शशिकांत शिंदे यांनी या कृत्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.
आयपीएल पुन्हा होणार ! बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीनेही दिले संकेत #IPL #surajyadigital #आयपीएल #सुराज्यडिजिटल #SouravGanguly #संकेत pic.twitter.com/bCjSyX14wB
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 6, 2021
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या साता-यातील निवासस्थानासमाेर शेण्या पेटविल्या. ज्यांनी शेण्या पेटविल्या ते तेथून लगेच पळून गेले. त्यानंतर काही वेळेतच सातारा शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यालयांवर दगडफेक झाली. दगडफेक करणारे व्यक्ती तेथून ही पळून गेले. पाेलिस अधिका-यांनी तिन्ही ठिकाणच्या घटनास्थळी भेट दिली. या परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी करणार असल्याचे पाेलिसांनी नमूद केले.
सोलापूर – उजनीचे पाणी पळवण्यावरुन सुरु आसलेल्या राजकीय आरोप- प्रत्यारोपानंतर सोशलमीडियावर व्यंगचित्र कार्टूनही व्हायरल होत आहेत. #surajyadigital #kartun #सुराज्यडिजिटल #political #आरोप pic.twitter.com/N6WP4Xlaxo
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 6, 2021