पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, अजित पवार यांचे फोटो मॉर्फ करुन बदनामी केल्याबद्दल 13 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी आकाश शिंदे ( वय 24) यांनी पुणे सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यानंतर भादंवि विविध कलमासह माहिती तंत्रज्ञान कायदा 67 नुसार 13 जणांवर गुन्हे दाखल झाला आहे.
काँग्रेस – राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दगडफेक आणि शेनफेक https://t.co/NS8xMHxm3J
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 6, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
फेसबुक, व्हाट्सअप आणि ट्विटर वर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची बदनामी केली होती. फिर्यादीवरुन राजेंद्र पवार, राज पाटील, मुकेश जाधव, स्वरूप भोसले, नाना पंडित, वैभव पाटील, जयसिंग मोहन, संदीप पाटील, शौर्यन श्रीकृष्ण चोरगे, महेश गहुडले, धनंजय जोशी, सोनाली राणे, अतुल अयाचित यांच्यावर गुन्हे दाखल झाले.
मॅरेथॉन जिंकणाऱ्या लताच्या पतीचा कोरोनाने घेतला बळी https://t.co/gkjzZcoXhh
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 6, 2021
* नेमका प्रकार, काय केले
या आरोपींनी फेसबुकवरील ‘राजकारण महाराष्ट्राचे’, कोमट बॉईज अँड गर्ल्स फेसबुक ग्रुप, CM Devendra Fadanvis Fan Club’ ग्रुप आणि व्हाट्सअपवरील ‘Intelectual Forum’ या ग्रुपच्या माध्यमातून उद्धव ठाकरे, अजित पवार आणि शरद पवार यांच्या विषयी बदनामीकारक मजकूर प्रसारित केला. तसेच राजकीय नेत्यांचे फोटो मॉर्फ करुन घाणेरड्या आणि अश्लील भाषेत सोशल मीडियावर कमेंट केल्या. तसेच ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर इतर जातीय तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट केल्या आहेत. याप्रकरणी तक्रार आल्यानंतर सायबर पोलिसांनी तेरा आरोपींवर गुन्हे दाखल केले आहे.
महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई; ज्वालाग्राही युरेनियमचा मोठा साठा जप्त https://t.co/3z8htgFV1O
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 6, 2021