सांगली : मध्यवर्ती कारागृहात एका संशयित आरोपीने बाथरुममध्ये टॉवेलने गळफास घेऊन आत्महत्या केली. दीपक आबा आवळे असे त्याचे नाव आहे. काही महिन्यांपूर्वी त्याच्यावर सांगली शहर पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. यापूर्वी तासगाव पोलिस ठाण्यातही एक गुन्हा दाखल होता. 5 ते 6 महिन्यांपासून त्याला येथील जिल्हा कारागृहात न्यायालयीन बंदी म्हणून ठेवण्यात आले होते.
अभिनेत्री श्री प्रदा यांचे कोरोनाने निधन https://t.co/nLE6ZyHUpu
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 6, 2021
आरोपीने बाथरूममधील ॲगलला गळफास घेऊन आत्महत्या केली. दीपक आवळे (रा. इंदिरानगर झोपडपट्टी, सांगली) असे त्याचे नाव असून बुधवारी रात्री साडे नऊच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेची शहर पोलिसात नोंद आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने मित्राला चिठ्ठी लिहिली होती.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
महाराष्ट्रात आज 62 हजार 194 नवे कोरोना रुग्ण तर 853 जणांच्या मृत्यूची नोंद #surajyadigital #maharashtra #coronavirus #महाराष्ट्र #कोरोना #मृत्यू #सुराज्यडिजिटल pic.twitter.com/lfyuimmngF
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 6, 2021
सहा महिन्यापूर्वी चोरीच्या गुन्ह्यात त्यास अटक करण्यात आली होती. त्यानंतर तो कारागृहात होता. मंगळवारी रात्री बाथरूममध्ये गेला व तिथे टॉवेलच्या सहाय्याने त्याने आत्महत्या केली. कारागृह प्रशासनाच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यास तातडीने शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, डॉक्टरांनी त्यास मृत घोषीत केले.
सोलापुरात आठवड्याचा कडक लॉकडाऊन जाहीर; किराणा दुकाने, भाजीपालाही बंद, यातच आला 'रमजान' आणि 'अक्षय्यतृतीया'https://t.co/LUm2W9o9DC
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 6, 2021
काही दिवसांपूर्वीच त्याने आपल्या कुटूंबियांना व मित्रांना उद्देशून लिहलेल्या चिठ्ठीत कोणीही गुन्हा करू नका, कारागृहातील दिवस वाईट असतात. कारागृहातून बाहेर आल्यानंतर सुधारायची इच्छा असून त्यासाठी काही दिवस सांगलीबाहेरही जायची तयारी असल्याचे त्याने म्हटले होते. तरीही त्याने आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही.
आठवडाभर राज्यावर अवकाळी पावसाचं संकट , कोण-कोणत्या जिल्ह्यात पहा https://t.co/308UAmtamT
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 6, 2021