वॉशिंग्टन : अवकाशात पाठवलेल्या रॉकेटवरील नियंत्रण गमावल्याने चिनी शास्त्रज्ञांवर टीका होत असाताना या रॉकेटबाबत महत्त्वाची माहिती अमेरिकेने दिली आहे. हे रॉकेट शनिवारी पृथ्वीवर कोसळण्याची शक्यता आहे. हे रॉकेट उद्या ८ मे रोजी पृथ्वीवर कोसळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सोलापुरात आठवड्याचा कडक लॉकडाऊन जाहीर; किराणा दुकाने, भाजीपालाही बंद, यातच आला 'रमजान' आणि 'अक्षय्यतृतीया'https://t.co/LUm2W9o9DC
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 6, 2021
जवळपास २१ टन वजनाचे हे रॉकेट घनदाट लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये कोसळू शकते. यामध्ये अमेरिकेचे न्यूयॉर्क, स्पेनचे माद्रिद, चीनची राजधानी बीजिंगचा समावेश आहे. मात्र, शास्त्रज्ञांकडून अद्यापही नेमक्या कोणत्या ठिकाणी रॉकेट कोसळले हे सांगण्यात आले नाही.
चीनमधून जगभर पसरलेल्या कोरोना व्हायरसने हाहाकार माजविलेला असताना पुन्हा एकदा चीन जगासाठी चिंतेचा विषय ठरला आहे. चीनने अंतराळात पाठविलेले रॉकेट अनियंत्रित झाले असून पृथ्वीवर पुन्हा प्रवेश करताना मोठा विध्वंस करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे जगभरातील देश चिंतेत पडले असून हे रॉकेट पृथ्वीच्या कक्षेत ८ मे रोजी प्रवेश करणार आहे. महत्वाचे म्हणजे चीनने याच रॉकेटवरून भारतातील पेटत्या चितांची खिल्ली उडविली होती.
तरुणांसाठी सुवर्ण संधी ! राज्यात आरोग्य विभागात १६ हजार पदांची भरती, तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी हालचालीhttps://t.co/NnD6SoPSxW
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 7, 2021
अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, अवकाश नियंत्रण गमावलेले चीनचे रॉकेट शनिवारी पृथ्वीच्या वातावरण कक्षेत प्रवेश करू शकतो. सॅटेलाइट ट्रॅक करणाऱ्यांनी सांगितले की, १०० फूट लांब आणि १६ फूट रुंद असलेला रॉकेट ४ मैल प्रति सेकंद या वेगाने पृथ्वीकडे येत आहे. या रॉकेटला त्यांनी 2021-035B हे नाव दिले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
खूशखबर! पेन्शनची मुदत 1 वर्षापर्यंत वाढविण्याचा निर्णय #surajyadigital #pension #पेन्शन #सुराज्यडिजिटल #1years pic.twitter.com/KHTVYejUW7
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 7, 2021
चीनने गेल्याच आठवड्यात स्पेस स्टेशन बांधण्यासाठी साहित्य लाँगमार्च ५ बी हे रॉकेट अंतराळात पाठविले होते. हे रॉकेट २९ एप्रिलला लाँच करण्यात आले होते. हे चीनचे सर्वात मोठे कॅरिअर रॉकेट आहे. गेल्या वेळी लाँच केलेल्या रॉकेटमुळे देखील धातूच्या मोठ्या मोठ्या सळ्या या रॉकेटमधून बाहेर पडल्या होत्या. त्या पृथ्वीवर कोसळल्याने आयव्हरी कोस्टच्या इमारतींना नुकसान झाले होते. काही सळ्या या आकाशात जळाल्या होत्या. आजचे हे रॉकेट ज्या गतीने पुढे जात आहे ते पाहता ते न्यूयॉर्क आणि माद्रीद किंवा दक्षिणेकडे चिली किंवा न्यूझीलंडच्या बाजुने प्रवेश करू शकते. या रॉकेटचा मार्गच अनियंत्रित झाल्याने ते कधी, कुठे वळेल हे देखील सांगता येत नाही, असे तज्ज्ञ जोनाथन मेगडोबल यांनी सांगितले.
कोरोना संकट – विराट कोहलीची मोठी घोषणा https://t.co/iHX3zBSbCY
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 7, 2021
अमेरिकन संरक्षण खात्याचे प्रवक्ते माइक हावर्ड यांनी सांगितले की, अमेरिकेचे स्पेस कमांड चीनच्या लाँग मार्च ५बी रॉकेटवर लक्ष ठेवून आहे. हे रॉकेट नेमकं कुठं कोसळणार याबाबत ठोसपणे आताच सांगता येणार नाही. पृथ्वीच्या वातावरणाच्या कक्षेत आल्यानंतर याबाबत भाष्य करता येईल. हे रॉकेट ८ मे रोजी पृथ्वीवर कोसळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
खगोल शास्त्रज्ञ जोनाथन मॅकडोवल यांनी स्पेस न्यूजला सांगितले की, सॅटलाइटच्या मार्गावर न्यूयॉर्क, माद्रिद, बीजिंग, चिली, न्यूझीलंड आहे. या भागात हे रॉकेट कुठेही कोसळू शकते. नागरी वस्ती असलेल्या भागात रॉकेट कोसळण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. मात्र, पृथ्वीच्या जवळ आल्यानंतर या रॉकेटचा बराचसा हिस्सा जळून खाक होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी कार्यालयाची तोडफोड करणाऱ्यांना राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी घरी जाऊन दम देवून जाब विचारला, मराठा आरक्षणाच्या निर्णयाशी राष्ट्रवादीचा संबंध नाही #political #surajyadigital #राष्ट्रवादी #MarathaReservation #NCP #तोडफोड #मराठाआरक्षणhttps://t.co/cabN8QQlB1
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 7, 2021
अमेरिकेच्या अंतराळ स्थानक केंद्राला आव्हान देण्याचा प्रयत्न चीनकडून सुरू झाला आहे. चीनच्या अंतराळ संशोधन संस्थेने काही दिवसांपूर्वीच हे २१ टन वजनाचे ‘लाँग मार्च ५ बी’ श्रेणीतील रॉकेट लाँच केले होते. अंतराळात चीनकडून अंतराळ स्थानक केंद्र उभारले जात आहे. नियोजनानुसार हे रॉकेट समुद्रात कोसळणार होते. मात्र, त्याआधीच नियंत्रण गमावल्याने चिंता वाढली आहे.
कोरोना लशीचे दोन्ही डोस देणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र नंबर वन, महाराष्ट्रानंतर कोणाचा नंबर ? https://t.co/S6M5si894c
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 7, 2021