कोल्हापूर : ऑक्सिजन क्षेत्रात संशोधन करणाऱ्या कोल्हापूरच्या संशोधकाचा चेन्नईत ऑक्सिजन न मिळाल्याने मृत्यू झाला. आहे. डॉ. भालचंद्र काकडे (वय 44) असं या डॉक्टरचं नाव आहे. काकडे चेन्नईतील एस. आर. एम. युनिव्हर्सिटीत कार्यरत होते. ऑक्सिजनचे सूक्ष्म गुणधर्म यावर काकडेंचं संशोधन होतं. इंधन निर्मिती व प्लॅटिनम संशोधनातील 7 पेटंट काकडेंच्या नावावर आहेत. काकडेंनी कोल्हापुरच्या शिवाजी विद्यापीठात आपलं शिक्षण पूर्ण केलं होतं.
पतीला प्रमोशन देणार नाही; धमकी देत विवाहितेवर बलात्कार, पुण्यातील घटना https://t.co/VmUVYiyZaj
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 8, 2021
डॉ. भालचंद्र काकडे हे चेन्नईतील एस आर एम युनिव्हर्सिटीत कार्यरत होते. ऑक्सिजनचे सूक्ष्म गुणधर्म यावर काकडे यांचं संशोधन होतं. इंधन निर्मिती आणि प्लॅटिनम संशोधनातील सात पेटंट काकडे यांच्या नावावर आहेत. मात्र कोरोनावर उपचार सुरु असताना ऑक्सिजन न मिळाल्याने त्यांच्यावर मृत्यू ओढवला.
तामिळनाडूमध्ये संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा #surajyadigital #तामिळनाडू #TamilnaduNews #घोषणा #सुराज्यडिजिटल #declare pic.twitter.com/yM6ZLkAemv
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 8, 2021
भालचंद्र काकडे यांच्या पत्नीही संशोधनकार्यात व्यस्त असतात. डॉ. भालचंद्र काकडे कार्यरत असलेल्या चेन्नईतील एसआरएम रिसर्च इन्सिट्यूटमध्येच पत्नीही संशोधनकार्य करते.
आमदार रोहित पवार यांनी निधनावर ट्वीट करुन श्रद्धांजली वाहिली आहे.
निःशब्द!
कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात ऑक्सिजन क्षेत्रात संशोधन करणारे डॉ. भालचंद्र काकडे यांचं उपचार घेताना ऑक्सिजनअभावी चेन्नईत निधन झालं, ही प्रचंड वेदना देणारी घटना आहे. आपण एका जागतिक पातळीवरच्या संशोधकाला गमावलं!
माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!💐🙏 pic.twitter.com/MOaG9SNOb2— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 8, 2021
संशोधक असलेल्या डॉ. भालचंद्र काकडे यांनी कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात आपलं शिक्षण पूर्ण केलं होतं. त्यांनी रसायनशास्त्र विषयात डिग्री मिळवली होती. मग त्यांनी ऑक्सिजन आणि हायड्रोजनच्या एकत्रित वापराबाबत संशोधन सुरु केलं होतं. केवळ संशोधन सुरु करुन ते थांबले नाहीत. त्यांनी यामध्ये तब्बल 7 पेटंटही मिळवली होती. त्यांच्या कर्तृत्त्वाने भारावलेल्या अमेरिका, जपानने त्यांना फेलोशिप दिली होती.
अभिनेत्री कंगना रणौतला कोरोनाची लागण, व्हायरस माझ्या शरिरात पार्टी करतोय,हर हर महादेव
https://t.co/GubrZElN6V— Surajya Digital (@SurajyaDigital) May 8, 2021
दरम्यान, डॉ. भालचंद्र काकडे हे जिथे संशोधन करत होते, त्या लॅबमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. लॅबमधील अनेकांना संसर्ग झाल्याने डॉ. काकडे यांचीही चाचणी करण्यात आली. मग त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यांनी आधी घरातच उपचार सुरु केले. मग त्यांना सरकारी कोव्हिड सेंटरमध्ये दाखल केल्याचं सांगण्यात येतंय. तिथे उपचारांना ते चांगला प्रतिसाद देत होते. मात्र चार दिवसापूर्वी म्हणजे मंगळवारी रात्री संबंधित रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा संपला. त्यामुळे भालचंद्र काकडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ऑक्सिजन संबंधित संशोधन करणाऱ्या डॉक्टरवर ऑक्सिजनअभावी मृत्यू ओढवतो यासारखं दुर्दैव नसावं.
मासे वाहतुकीचा ट्रक पलटी, फुकटचे मासे नेण्यासाठी लोकांची उडाली झुंबड https://t.co/Dr0hSl9Jyc
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 8, 2021