मुंबई : कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्यात १५ मेपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला. त्यातच १५ मे नंतर लॉकडाऊनमध्ये वाढ होणार का? यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी उत्तर दिलं. १२ जिल्ह्यांमध्ये कोरोना स्थिती कमी झाली तरी काही जिल्ह्यांमध्ये कोरोना वाढत आहे. अशीच स्थिती राहिली तर कडक लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात येईल. राज्यातील लॉकडाऊन वाढवायचा की नाही याचा विचार १५ मे नंतर करण्यात येईल, असं टोपे म्हणाले.
जुनी आयडीबीआय बँक सरकार विक्री करण्याच्या तयारीत, खासगीकरणाच्या निर्णयाला विरोध https://t.co/FZtkEbA7yI
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 8, 2021
‘गेल्या काही दिवसांपासून राज्यात दररोज ५० हजारांवर नवे रुग्ण आढळून येत आहेत. कोरोनाचा पॉझिटिव्हीटी रेट अपेक्षेप्रमाणे कमी झालेला नाही. राज्यातील ३६ जिल्ह्यांपैकी १२ जिल्ह्यांमध्ये दर कमी झाला आहे. पण परिस्थिती नियंत्रणात आलेली नाही. त्यामुळे निर्बंध काढून घेण्यात आले तर परिस्थिती पुन्हा एकदा हाताबाहेर जाऊ शकते. त्यामुळे यासाठी महाराष्ट्रवासीयांना तयारीत राहावे लागणार आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
चीनचे भरकटलेले २१ टन वजनाचे रॉकेट उद्या पृथ्वीवर कोसळण्याची शक्यता https://t.co/3gyUm2lwSy
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 8, 2021
काही जिल्ह्यांमध्ये अजूनही कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढत चालली आहे. लॉकडाऊनच्या निर्णयाबाबत १५ मेपर्यंत पुढील चित्र स्पष्ट होईल. जर रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर १५ मेनंतर राज्यात कडक लॉकडाऊन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी राज्य सरकार उपाययोजना आखत आहे. बेड्स वाढवणं, ऑक्सिजन, रेमडेसिवीर आणि इतर वैद्यकीय सुविधांमध्ये कशी वाढ करता येईल यासाठी सातत्यानं प्रयत्न सुरू आहे. त्याचबरोबर लसीकरणाचा वेग वाढविण्याच्या दृष्टीनंही सरकार प्रयत्नशील आहे, असं टोपे म्हणाले.
बैठकीत सूचनांचा भडिमार करणाराच निघाला बोगस डॉक्टर, सोलापुरातील घटना https://t.co/AO73C7Kyxv
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 8, 2021