Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: जगाने सुटकेचा निःश्वास  सोडला, चीनचे भरकटलेले रॉकेट समुद्रात कोसळले
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

जगाने सुटकेचा निःश्वास  सोडला, चीनचे भरकटलेले रॉकेट समुद्रात कोसळले

Surajya Digital
Last updated: 2021/05/09 at 10:59 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय असलेले चीनचे 21 टन वजनी भरकटलेले रॉकेट अखेर समुद्रात कोसळले आहे, त्यामुळे जगाने सुटकेचा निःश्वास  सोडला आहे. काहीवेळापूर्वीच या रॉकेटचे अवशेष अरबी महासागरात कोसळल्याचे वृत्त ‘एएफपी’ न्यूजने दिले आहे.

मागील काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनलेल्या चीनच्या अनियंत्रित रॉकेटने पृथ्वीवर लँडींग केली आहे. चीनचे रॉकेट अरबी समुद्रात कोसळल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. या रॉकेटचे अवशेष अरबी समुद्रात आढळले आहेत.

महाराष्ट्र – दोन दिवस विदर्भासह राज्यात दोन दिवस जोरदार पावसाचा अंदाज #surajyadigital #rain #maharashtra #जोरदार #सुराज्यडिजिटल #पाऊस #2day pic.twitter.com/QLYIIGtw7A

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 9, 2021

चीनने लॉन्ग मार्च 5बी रॉकेट 29 एप्रिलला चीनच्या हाइनान द्वीपवरुन लॉन्च केले होते. हे रॉकेट अंतराळात स्पेस स्टेशन बांधण्यासाठी साहित्य घेऊन जात होते. पण, काही बिघाड झाल्यामुळे रॉकेट पृथ्वीच्या दिशेने अनियंत्रित होऊ निघाले. हे रॉकेट पृथ्वीच्या पृष्ठ भागावर कोसळल्यास मोठे नुकसान होईल, अशी शक्यता चिनी माध्यमांनी वर्तवली होती. पण, पृथ्वीच्या कक्षेत आल्यानंतर हे रॉकेट नष्ट करण्यात आले. त्यानंतर रॉकेटचे तुकडे समुद्रात जाऊन कोसळले.

चीनचे भरकटलेले २१ टन वजनाचे रॉकेट उद्या पृथ्वीवर कोसळण्याची शक्यता https://t.co/3gyUm2lwSy

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 8, 2021

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

तांत्रिक बिघाड झाल्यामुळे या रॉकेटने पृथ्वीच्या दिशेने उलटा आणि अनियंत्रित प्रवास सुरु केला होता. हे रॉकेट पृथ्वीवर कोसळल्यास मोठे नुकसान होईल, अशी शक्यता चिनी माध्यमांनी वर्तविली होती. मात्र, पृथ्वीच्या कक्षेत आल्यानंतर हे रॉकेट नष्ट करण्यात आले. त्यानंतर रॉकेटचे तुकडे समुद्रात जाऊन कोसळले, अशी माहिती रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिली आहे.

अंतराळात रॉकेटचा मुख्य भाग फिरत होता. हाच भाग पृथ्वीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. रॉकेटचा हा भाग जवळपास 100 फूट लांब होते. याचे वजन तब्बल 21 टन होते. मात्र, पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करताना या रॉकेटचे तुकडे झाल्याची शक्यता आहे.

जुनी आयडीबीआय बँक सरकार विक्री करण्याच्या तयारीत, खासगीकरणाच्या निर्णयाला विरोध https://t.co/FZtkEbA7yI

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 8, 2021

पृथ्वीवर पडणाऱ्या या रॉकेटचे नाव लॉन्ग मार्च 5-बी वाय-2 असे होते. सध्या हे रॉकेट पृथ्वीच्या बाजूने लो-अर्थ ऑरबिटमध्ये फिरत होते. म्हणजेच हे रॉकेट सध्या पृथ्वीपासून 170 ते 372 किलोमीटर उंचीवर आहे. हे रॉकेट पृथ्वीभोवती तब्बल 25,490 किलोमीटर प्रतितास म्हणजेच एका सेकंदाला 7.20 किलोमीटर एवढ्या गतीने फिरत होते.

पतीला प्रमोशन देणार नाही; धमकी देत विवाहितेवर बलात्कार, पुण्यातील घटना https://t.co/VmUVYiyZaj

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 8, 2021

You Might Also Like

गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी

युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा

युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा

अंतराळ स्थानकाहून शुक्लांचा हिंदी भाषेतून संदेश

‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल

TAGGED: #world #breathed #sigh #relief #China's #rocket #crashed #sea, #जगाने #सुटकेचा #निःश्वास   #सोडला #चीनचे #भरकटलेले #रॉकेट #समुद्रात #कोसळले
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष : मागासवर्गाचे पदोन्नती आरक्षण रद्द, माजी मंत्री बडोलेंचा सरकारला इशारा
Next Article सोलापूर – पुणे महामार्गावरील भुयारी मार्गासाठी २० कोटी ६३ लाख मंजूर

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?