सांगली : सांगली जिल्ह्यात आज मनपा कार्यक्षेत्रात 116 नवीन रुग्ण, शहरी भागात 4 नवीन रुग्ण, ग्रामीण भागात 19 एकूण रुग्ण आढळून आले आहेत. सर्व मिळून आज तब्बल 139 रुग्णांची भर पडल्याने रुग्णसंख्या 1 हजार 898 वर पोहोचली आहे. मात्र आज दुर्दैवाने सात रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सांगलीत कोरोनाचा वेग वाढला असून चिंता निर्माण झाली आहे.
जिल्ह्याची रुग्णसंख्या 1 हजार 898 वर पोहोचली आहे. तरी बरे झालेले रुग्ण संख्या 910 इतकी आहे. आणि उपचाराखाली 924 रुग्ण आहेत. आतापर्यत 64 रुग्ण आज अखेर मृत्यू झाले आहेत. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी 33 रुग्ण चिंताजनक आहेत. तसेच 27 रुग्ण कोरोना मुक्त ही आज झालेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आज अखेर ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 802, शहरी भागातील 134, मनपा क्षेत्रातील 962, अशी आहे मनपा क्षेत्रानेही आता 962 आकडा ओलांडलेला आहे. आजचे नवीन पॉझिटिव आटपाडी 4, कडेगाव 1,मिरज तालुक्यातील 4,पलूस तालुक्यातील 1, वाळवा तालुका 6,तासगाव तालुका 1,सांगली 62 मिरज 54 शिराळा तालुका 1,असा आहे.
आजच्या मृतांमध्ये हरिपूर येथील 54 वर्षांचा पुरुष,पलूस येथील 65 वर्षांचा पुरुष, कवठेमहांकाळ येथील 55 वर्षांची महिला, मिरज येथील 51 वर्षांचा पुरुष, मिरज येथील 37 वर्षांचा पुरुष, आणि मिरज येथील 75 वर्षांची महिला व 68 वर्षांचा पुरुष असा समावेश आहे.
* तालुकानिहाय रुग्ण संख्या
आटपाडी 121,जत 122, कडेगाव 56, कवठेमहांकाळ 60, खानापूर 49, मिरज 118, पलूस 82, शिराळा 180, तासगाव 43, वाळवा 105, मनपा 962, अशी आहे.