मुंबई : सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केले. त्यानंतर आता ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण उपसमिती अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह इतर सदस्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. आज मंगळवारी संध्याकाळी हे सर्वजण राज्यपालांना भेटून मराठा आरक्षणाबाबत निवेदन देणार आहेत.
५० लाख लसी युकेला पाठवण्याचा प्रस्ताव मोदी सरकारने फेटाळला https://t.co/j5oEugViAq
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 11, 2021
मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहिलं आहे, ते पत्र राज्यपालांकडे सुपूर्द करण्यात येईल. आरक्षणाचा निर्णय घेण्याचा अधिकार राज्याला नसून तो केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींनाच असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने मागच्या सुनावणीत सांगितलं होते. त्याप्रमाणे उद्धव ठाकरे आता हा मुद्दा थेट राष्ट्रपतींकडे मांडत आहेत.
अनेक मृतदेह वाहत येत आहेत, युपी बिहारमध्ये खळबळ, संख्या शंभरपर्यत जावू शकते, यूपी -बिहारमध्ये दोषारोप
https://t.co/rQr5G7Aro7— Surajya Digital (@SurajyaDigital) May 11, 2021
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज (11 मे) संध्याकाळी पाच वाजता राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहिलं आहे, ते पत्र राज्यपालांकडे सुपूर्द करण्यात येईल. आरक्षणाचा निर्णय घेण्याचा अधिकार राज्याला नसून तो केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींनाच असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने मागच्या सुनावणीत सांगितलं होते. त्याप्रमाणे उद्धव ठाकरे आता हा मुद्दा थेट राष्ट्रपतींकडे मांडत आहेत. राज्याच्या विधीमंडळात सर्वच राजकीय पक्षांनी एकमुखाने घेतलेल्या या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने वरवंटा फिरवला असल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली होती. आता पुन्हा मराठा आरक्षणाचा चेंडू केंद्राच्या कोर्टात ढकलण्यात येत आहेत.
पंढरपूर पोटनिवडणूक : दोन शिक्षकांचा मृत्यू, एका कुटुंबातील चौघांचा मृत्यू https://t.co/9HnBt32AAN
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 11, 2021
दरम्यान, जवळपास वर्षभरानंतर राज्यपाल भगत कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट होत आहे. विमान प्रवासावरुन मानापमान नाट्य, राज्यपाल नियुक्त सदस्य, राज्यपालांनी लिहिलेलं पत्र, कोरोना आणि कंगाना असे अनेक वाद गेल्या वर्षभरात राज्यपाल आणि ठाकरेंमध्ये रंगले होते. त्यामुळे ही भेट कशी होते, या भेटीत काय घडतं, याकडे सर्व राजकारणी नेते लक्ष लावून बसले आहेत.
म्यूकोर्मिकोसिसशी नावाचा आला आजार, ४०% पेक्षा जास्त मृत्यूचा धोका, आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा https://t.co/4a4aUaPLpU
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 11, 2021