मुंबई : मराठा आरक्षणाविषयी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. मराठा समाजाला त्यांचा हक्क आम्ही मिळवून देणार, असे ठाकरे यांनी म्हटले आहे. मराठा आरक्षणाचा कायदा केंद्राने करावा, अशी मागणी करण्यासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार, असेही ते म्हणाले. आज ठाकरे यांच्यासह सरकारच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यांना मराठा आरक्षणासंदर्भात निवेदन दिले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यपालांच्या भेटीनंतर पत्रकार परिषद घेतलीय. त्यावेळी ते बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्दबातल केल्यानंतर जोरदार राजकारणाला सुरुवात झालीय. मराठा आरक्षणाची लढाई संपलेली नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी आधीच जाहीर केलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली.
इंटरनेटशिवाय वापरा व्हॉट्सॲप !; नवीन फीचर https://t.co/PVxck1nw23
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 11, 2021
मराठा समाजाने नेहमीच समजूतदारपणा दाखवलेला आहे. मराठ्यांची लढाई ही सरकारविरोधात नाही. काय झाले ते सगळ्यांच्या समोरच आहे. त्यामुळेच आम्हाला राज्यपालांना भेटायला यावं लागलं. देवेंद्र फडणवीसांनी बनवलेला तो कायदा जर फुलप्रूफ असता तर भेटण्याचा योग यासाठी आला नसता. भाजपलाही हा निर्णय लवकरात लवकर अपेक्षित असायला काही हरकत नाही, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेत.
नियमांची ऐशीतैशी; मुस्लिम धर्मगुरुच्या अंत्ययात्रेसाठी तुफान गर्दी, ट्वीट केलेला पहा व्हिडिओ https://t.co/64OEngLYvU
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 11, 2021
आरक्षणाचा न्यायहक्क मिळाला पाहिजे ही आमची भावना आहे. आरक्षण देण्याचा अधिकार राज्याचा नसून केंद्राचा आहे. राष्ट्रपती महोदयांचा आहे. आम्ही आमच्या भावना राष्ट्रपती आणि केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी राज्यपालांची भेट घेतली. विधिमंडळात हा निर्णय एकमताने घेतलेला होता. त्याचा आदर करून या समाजाला न्यायहक्क मिळाला पाहिजे, अशी आमची भावना आहे. राज्यपालांनी सांगितलं की, आपल्या भावना केंद्रापर्यंत पोहोचू, असंही ते म्हणालेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मराठा आरक्षण मुद्दावर भेट #surajyadigital #मराठा #आरक्षण #सुराज्यडिजिटल #MarathaReservation #meeting #Governor
– मुख्यमंत्र्यांसह महाविकास आघाडी नेते हे राज्यपाल यांच्या भेटीला गेले. सरकारच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट. मराठा आरक्षणासंदर्भात निवेदन दिले pic.twitter.com/jwKgYw2uAe— Surajya Digital (@SurajyaDigital) May 11, 2021
आम्ही लवकरच पंतप्रधानांना भेटू. महाराष्ट्राच्या विधिमंडळाने मराठा आरक्षणाचा निर्णय एकमताने घेतला होता. त्याला विरोध झाला. पण आता जो निर्णय झाला तो जनतेचा आहे. समाजाला न्याय मिळाला पाहिजे. जसं आज राज्यपालांना पत्र दिलं, तसं पंतप्रधानांची भेट घेऊन पत्र देऊ. आज राष्ट्रपतींना पत्र दिलं. आता पंतप्रधानांनी रितसर वेळ मागून भेट घेऊ आणि त्यांनाही पत्र देऊ, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
मराठा आरक्षणाचा कायदा तयार करताना आमच्यासोबत असलेले आणि कायदा बनल्यानंतर त्याचे श्रेय घेणारे आज म्हणतात की, कायदा ‘फुलप्रूफ’ नव्हता!
किती हा दुटप्पीपणा?— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) May 11, 2021
* देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना दिले प्रत्युत्तर
“मराठा आरक्षणाचा कायदा तयार करताना आमच्यासोबत असलेले आणि कायदा बनल्यानंतर त्याचे श्रेय घेणारे आज म्हणतात की, कायदा ‘फुलप्रूफ’ नव्हता! किती हा दुटप्पीपणा?,” असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. “मग प्रश्न उपस्थित होतो की, भाजप सरकारच्या काळात हाच कायदा उच्च न्यायालयात वैध ठरतो आणि सर्वोच्च न्यायालय सुद्धा स्थगिती देण्यास नकार देते. परंतु नव्या सरकारच्या काळात स्थगिती मिळते आणि कायदाही अवैध ठरतो. मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी कोण?,” असा सवालही त्यांनी केला आहे.
काळ्या बुरशीजन्य म्युकोरोमायकॉसिस नावाच्या आजाराबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे अधिक माहिती देताना #surajyadigital #आजार #आरोग्यमंत्री #बुरशीजन्य #सुराज्यडिजिटल #माहिती #informationhttps://t.co/8JjtTDyoIu
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 11, 2021