वर्धा : वर्ध्याच्या नाचणगाव येथे घराचे खोदकाम करताना सोन्याचा खजिना सापडला आहे. नाचणगाव येथे शेतकरी सतीश चांदोरे यांनी जुने घर विकत घेतले आहे. खोदकामानंतर मातीचा ढिग शेतात टाकताना एका डबी सापडली. त्यात मुघलकालीन नाण्यांसह 4 किलो 28 ग्रॅम सोनं होतं. या घटनेचं वृत्त समजताच पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेऊन हे सोनं ताब्यात घेतलं आहे.
आमदार प्रणिती शिंदे यांनी गरजूंसाठी स्वत: लाटल्या पोळ्या https://t.co/IlIlYuYqIz
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 12, 2021
यात सोन्याचं बिस्किटही आढळलं आहे. त्याची आजची किंमत 20 लाख 54 हजार इतकी आहे. यानंतर बघ्यांची एकच झुंबड उडाली. पुरातत्व विभागाने पुढील कारवाई सुरू केली आहे. खोदकामानंतर मातीचा ढिगारा शेतात टाकताना एका डबी सापडली. त्यात मुघलकालीन नाण्यांसह 4 किलो 28 ग्रॅम सोनं होतं. त्यात सोन्याचं बिस्किटही आढळून आलं. मुघलकालीन सोनं घरात सापडल्याची वार्ता कळल्यानंतर नाचणगाव येथे बघ्यांची एकच झुंबड उडाली.
इंटरनॅशनल नर्स डे हार्दिक शुभेच्छा! सर्व कर्तृत्ववान परिचारिकांना सलाम#sisterday #परिचारिका #day #surajyadigital #sisters #सुराज्यडिजिटल #nurse #nurseday #नर्स pic.twitter.com/exCQxFmnXk
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 12, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
जुन्या घराचं खोदकाम त्यांनी सुरू केले. खोदकामातील मातीचा ढिगारा शेतात नेऊन टाकण्यात आला. दरम्यान हा ढिगाराही साफ करण्यात आला. हा कचरा साफ करताना मजुरांना एक डबी कचऱ्यात सापडली. डबीमध्ये सोनं आढळून आलं. त्यात एक सोन्याचं बिस्कीट आणि मुघलकालीन नाणे, कानातील रिंग असे एकूण 9 आभूषणे सापडली. मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी हे सोन ताब्यात घेतलं. ही बाब पुरातत्व विभागाशी संबंधित असल्याने त्यांच्याशी संपर्क साधत पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांनी दिली.
आजपासून 16 मे पर्यंत या जिल्ह्यात पावसाची शक्यता #surajyadigital #District #सुराज्यडिजिटल #rain #शक्यता pic.twitter.com/msZ3ufJ7EP
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 12, 2021
पंतप्रधानांवर कोणी टीका करतंय हे काँग्रेस कधीही सहन करणार नाही, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले #Congress #PM #NanaPatole #नानापटोले #काँग्रेस #live #सहनhttps://t.co/4N8tdlfA7b
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 12, 2021
मुघलकालीन नाणी यात सापडली असल्याने पुलगाव शहराच्या इतिहासाबाबत नवीन माहिती प्राप्त होण्याची शक्यता आहे. ही नाणी येथे कशी आली? मुघलकाळातील कोणत्या राजाच्या काळातील ही नाणी आहे? त्या मागचा इतिहास काय आहे? आदींचा अभ्यास करण्यात पुरातत्व विभागाला मदत होणार असल्याचं रवींद्र गायकवाड यांनी सांगितलं. दरम्यान, सोन्याचं घबाड सापडल्याने पंचक्रोशीत चर्चांना एकच उधाण आलं असून सोनं पाहण्याच्या उत्सुकतेने अनेकजण नाचणगाव गाठत आहे.
तेलंगणात आजपासून दहा दिवस लॉकडाऊन #Telangana #lockdown #surajyadigital #सुराज्यडिजिटल #लॉकडाऊन #तेलंगाना pic.twitter.com/lHZjKThAQ4
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 12, 2021