नवी दिल्ली : कोरोना विरोधातील लढाईसाठी एक चांगली बातमी आहे. तज्ज्ञ समितीने भारत बायोटेकची कोवॅक्सिन या स्वदेशी कोरोना लसीची 2 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांवर चाचणीसाठी शिफारस केली आहे. दुसऱ्या तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीसाठी ही शिफारस करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. या चाचणीची परवानगी कोवॅक्सिनने सरकारकडे मागितली होती. त्यानंतर तज्ञ समितीने ही शिफारस केली आहे.
उत्तराखंडमध्ये ढगफुटी; घरं, दुकानं जमीनदोस्त झाल्यानं मोठी हानी, पहा व्हिडिओ https://t.co/4Fz3Hm1FsN
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 12, 2021
देशभरात सध्या 18 वर्षांवरील सर्वच नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. सरकारतर्फे लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. त्यातच कोरोनाची तिसरी लाट ही लहान मुलांना सर्वात जास्त घातक असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. दरम्यान, आता भारतामध्ये लहान मुलांनाही कोरोनाची लस मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. 2 ते 18 वर्ष वयोगटातील लहान मुलांना तिसर्या लाटेत मोठ्या संक्रमणाचा धोका असल्याचं बोललं जात असतानाच आता 2 ते 18 वर्षांच्या मुलांना कोरोना लस देण्याच्या ट्रायलला मंजुरी देण्यात आली आहे. तसेच लवकरच या वयोगटातील मुलांना लस देण्याची मोहीम सुरू होईल.
वर्ध्यात सापडले मुघलकालीन चार किलो सोने https://t.co/39xtai7BsZ
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 12, 2021
लहान मुलांना देण्यात येणारी कोरोना लसीची चाचणी करण्याची शिफारस सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीने केली होती. त्यानंतर, मंगळवारी त्याला मंजुरी देण्यात आली असून 525 मुलांवर क्लिनिकल ट्रायल केली जाणार आहे. यामध्ये दिल्ली येथील एम्स, पाटणामधील एम्स तसेच नागपूरमधील एम्स रुग्णालयात या ट्रायल करण्यात येणार आहेत.
US approves Corona vaccine for children between 12 and 15 yearshttps://t.co/WACoTOhwdj pic.twitter.com/wdztTphNWD
— DD NEWS SRINAGAR (@ddnewsSrinagar) May 12, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
2 ते 18 वर्षांच्या मुलांवर करण्यात येणाऱ्या भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनच्या फेज 2 आणि फेज 3 च्या क्लिनिकल ट्रायलला मंजुरी द्यायला हवी, अशी शिफारस SECने केली होती. भारतात सध्या ज्या दोन व्हॅक्सिनचा उपयोग केला जात आहे. त्या केवळ 18 वर्षांवरील अधिक वयाच्या लोकांना दिल्या जात आहेत. भारतात सीरमची कोविशील्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनचा वापर केला जात आहे.
आमदार प्रणिती शिंदे यांनी गरजूंसाठी स्वत: लाटल्या पोळ्या https://t.co/IlIlYuYqIz
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 12, 2021
कमिटीने केलेल्या शिफारशीनुसार, भारत बायोटेक या कंपनीला फेज-3 ची ट्रायल पूर्ण करण्याअगोदरच फेज-2 चा संपूर्ण डेटा द्यावा लागणार आहे. भारत बायोटेकचा फेज 2 आणि फेस 3 च्या क्लिनिकल ट्रायलला मंजुरी देण्यात यावी अशी शिफारस सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीने केली होती. ज्यामध्ये 2 ते 18 वर्षांच्या मुलांसाठी करण्यात येणार्या कोवॅक्सिनचा समावेश आहे. भारतात तिसऱ्या लाटेची शक्यता असल्यामुळे लवकरच लहान मुलांनाही कोरोनाची लस देण्याचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आता या ट्रायल्स पूर्ण होऊन लहान मुलांना कधीपर्यंत लस उपलब्ध होईल, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
पंतप्रधानांवर कोणी टीका करतंय हे काँग्रेस कधीही सहन करणार नाही, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले #Congress #PM #NanaPatole #नानापटोले #काँग्रेस #live #सहनhttps://t.co/4N8tdlfA7b
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 12, 2021