जेरुसलेम : इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये सध्या संघर्ष सुरु आहे. यादरम्यान पॅलेस्टाईनमधील दहशतवाद्यांनी गाझा पट्टीतून इस्रायलच्या ॲशकेलोन शहरात रॉकेट हल्ला केला. हा रॉकेट भारतीय महिला सौम्या संतोष (वय ३१ ) यांच्या घरावर पडला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. सौम्या संतोष या केरळच्या आहेत. जेव्हा ही घटना घडली तेव्हा सौम्या पतीशी व्हिडिओ कॉलवर बोलत होत्या. गेल्या ७ वर्षांपासून त्या इस्रायलमध्ये वास्तव्याला होत्या.
वर्ध्यात सापडले मुघलकालीन चार किलो सोने https://t.co/39xtai7BsZ
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 12, 2021
केरळमधील एका महिलेचा इस्त्रायलमध्ये मृत्यू झाला आहे. पॅलेस्टाइनने केलेल्या रॉकेट हल्ल्यामध्ये महिलेने आपला जीव गमावला असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, ३१ वर्षीय सौम्या व्हिडीओ कॉलवर पती संतोषसोबत बोलत असतानाच शहरावर रॉकेट हल्ला झाला. हे रॉकेट सौम्या यांच्या निवासस्थानावर कोसळलं आणि त्यांचं निधन झालं.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
भारतात लवकरच लहान मुलांना कोरोना लस https://t.co/xQTCxVS2pR
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 12, 2021
“माझ्या भावाला व्हिडीओ कॉल सुरु असतानाच मोठा आवाज ऐकू आला. यानंतर अचानक व्हिडीओ कॉल कट झाला. आम्ही तात्काळ तेथील इतर आमच्या ओळखींच्या लोकांना फोन केले तेव्हा झालेल्या घटनेची माहिती मिळाली,” असं संतोष यांच्या भावाने पीटीआयला सांगितलं आहे.
इडुक्की जिल्ह्यातील किरीथोडू येथील रहिवासी असणाऱ्या सौम्या इस्त्रायलमध्ये गेल्या सात वर्षांपासून काम करत होते. सौम्या तिथे घरकाम करायच्या अशी माहिती नातेवाईकांनी दिली आहे. नवनविर्वाचित आमदार आणि काँग्रेस नेते मनी कप्पन यांनी या घटनेचा निषेध केला आहे. त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारने या प्रकरणात मध्यस्थी करण्याची मागणी केली आहे.
उत्तराखंडमध्ये ढगफुटी; घरं, दुकानं जमीनदोस्त झाल्यानं मोठी हानी, पहा व्हिडिओ https://t.co/4Fz3Hm1FsN
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 12, 2021