Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: भाजप खासदार, आमदारांचे सोलापुरात लाक्षणिक उपोषण
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsराजकारणसोलापूर

भाजप खासदार, आमदारांचे सोलापुरात लाक्षणिक उपोषण

Surajya Digital
Last updated: 2021/05/13 at 3:41 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर : केंद्र शासन व राज्य शासनामार्फत रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन, ऑक्‍सिजन पुरवठा व कोव्हिड लसींचा पुरवठा पुणे विभागातील जिल्ह्यांना केला जात आहे. पण सोलापूर जिल्ह्याला सापत्न वागणूक देऊन रुग्णांच्या संख्येनुसार इंजेक्‍शन, ऑक्‍सिजन, लशींचा पुरवठा होत नाही, याच्या निषेधार्थ सोलापूर जिल्ह्यातील भाजपचे खासदार व आमदारांनी आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले.

https://twitter.com/SurajyaDigital/status/1392505123104907268?s=19

“या सरकारचं करायचं काय, खाली मुंडी वरती पाय…’ यासह राज्य सरकारविरोधी जोरात घोषणाबाजी देण्यात आल्या. खासदार जयसिद्धेश्‍वर शिवाचार्य महास्वामी, खासदार रणजितसिंह नाईक – निंबाळकर, आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार प्रशांत परिचारक, पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार सचिन कल्याणशेट्टी, धैर्यशील मोहिते-पाटील, आमदार राजेंद्र राऊत, भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, शहराध्यक्ष विक्रम देशमुख, आमदार राम सातपुते आदींनी उपोषणात सहभाग घेतला. दुपारी सर्व आमदार व खासदारांनी पायी चालत जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

https://twitter.com/SurajyaDigital/status/1392689105142571010?s=19

* मामांचा उपरोधिक टोला

सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण देशात सध्या कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. अशा जीवघेण्या काळात नौटंकी करू नका. कृतिशील सहभाग नोंदवा. कृतिशील सहभाग नोंदवून लोकांच्या मदतीला धावून आलात. तर त्याच पूनम गेटवर तुमचा जाहीर सत्कार करेन. असा उपरोधिक टोला पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भाजप आमदार, खासदारांना लगावला आहे.

* सोलापूर जिल्ह्याचा कोटा इतर जिल्ह्यांना दिला जातोय

पुणे विभागासाठी केंद्र शासन व राज्य शासन यांच्याकडून रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन, ऑक्‍सिजन व कोव्हिड लस पुरवठा करताना पुणे विभागामध्ये सोलापूर जिल्ह्यावर वितरणाबाबत अन्याय होत आहे. सोलापूर जिल्ह्याला रुग्णांच्या प्रमाणात रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन दिली जात नाहीत. ऑक्‍सिजनचा पुरवठा अद्यापही सुरळीत केला जात नाही. कोव्हिड लसही लोकसंख्येच्या प्रमाणात दिली जात नाही.

टेस्ट किटचा पुरवठा जिल्ह्याला कमी प्रमाणात केला जातो. याउलट पुणे विभागातील इतर जिल्ह्यांमध्ये जिल्ह्याचे मंत्री आहेत त्यांच्या जिल्ह्यास जास्त प्रमाणात झुकते माप देऊन सोलापूर जिल्ह्याचाही कोटा इतर जिल्ह्यांना दिला जात आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील कोव्हिड रुग्णसंख्या वाढत असून त्याचा परिणाम जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या मृत्यूदरामध्ये झालेला आहे.

https://twitter.com/SurajyaDigital/status/1392751134217965568?s=19

You Might Also Like

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

फडणवीसांच्या मतदारसंघात 8 टक्के मतदार वाढले- राहुल गांधी

TAGGED: #Typical #fast #BJP #MPs #MLAs #Solapur, #भाजप #खासदार #आमदारांचे #सोलापुरात #लाक्षणिक #उपोषण
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article गुगल पेची ग्राहकांसाठी खुशखबर ! अमेरिकेतून भारतात पैसे पाठवा
Next Article रिक्षा चालकांना अनुदानासाठी फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?