मुंबई : सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी ‘लव यू जिंदगी’ या गाण्यासोबत एका मुलीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. डॉ. मोनिका लांगेह यांनी रुग्णालयातील मुलीचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला होता. व्हिडिओमधील मुलगी कोरोना पॉझिटिव्ह असताना देखील उत्साही दिसत होती. गुरुवारी रात्री डॉ. मोनिका यांनी तिचा मृत्यू झाल्याची माहिती ट्विटरवर दिली.
https://twitter.com/drmonika_langeh/status/1392871777739575301?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1392871777739575301%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F
जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत आनंदाने जगून घ्या, असं प्रत्येकजण सांगतं. मात्र असं फार कमी लोकांना करायला जमतं. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर ‘लव यू जिंदगी’ या गाण्याचा कोविड सेंटरमध्ये आनंद घेणाऱ्या मुलीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. कोरोना काळात परिस्थिती खूप गंभीर असताना हा व्हिडिओ समोर आला होता. मात्र आता या मुलीची कोरोना विरुद्ध झुंज अखेर अपयशी ठरली आहे.
ट्विटरवर डॉ. मोनिका लांगेहने हॉस्पिटलमधील कोविड इमरजेंसी वॉर्डमध्ये 30 वर्षीय रूग्णाची स्टोरी व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओ खूप दिवस सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओमधील तरूणीची सकारात्मकता पाहून सगळ्यांनाच आनंद झाला.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1393158357544947713?s=19
देशाता करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन आणि बेड्स उपलब्ध नसल्याने रुग्णांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. अशा परिस्थितीत देखील काही प्रसंग हे लोकांसाठी हुरूप निर्माण करण्याचं काम करत आहेत. सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी ‘लव यू जिंदगी’ या गाण्यासोबत एका मुलीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. व्हिडिओ पाहून लोकांमध्ये थोड्याफार प्रमाणात सकारात्मता निर्माण झाली होती. त्या महिलेचा आता मृत्यू झाला आहे. महिलेवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी याची माहिती दिली आहे.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1393133201661431809?s=19
डॉ. मोनिका लांगेह यांनी रुग्णालयातील एका ३० वर्षीय महिलेचा व्हडिओ ट्विटरवर शेअर केला होता.
8 मे रोजी मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. मोनिका लांगेह यांनी आयसीयूमध्ये बेड नसल्यामुळे एक मुलगी बाहेर बसली होती. यामुळे ही मुलगी कोविड एमरजेंसी वॉर्डमध्ये ऍडमिट होती. एनआयव्हीमध्ये ठेवण्यात होती. यासोबतच रेमडेसिवीर आणि प्लाझ्मा थेरेपी देण्यात आली होती.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
डॉ. मोनिका लांगेह यांनी सांगितलं होतं की,’या मुलीमध्ये दृढ इच्छाशक्ती होती. वॉर्डमध्ये भर्ती झाल्यानंतर तिला मनोबल वाढवण्यासाठी गाणं ऐकते. ती मुलगी शाहरूख खान आणि आलिया भट्टच्या 2016 रोजी प्रदर्शित ‘डिअर जिंदगी’ सिनेमातील ‘लव यू जिंदगी’ गाण्यावर मन रमवत होती.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1393123188096131074?s=19
डॉ. मोनिका यांनी ८ मे रोजी एक व्हिडिओ ट्विट केला होता. त्यामध्ये व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या तरुण मुलीला आयसीयू बेड मिळाला नव्हता यामुळे ती कोव्हिड आपत्कालीन कक्षात गेल्या १० दिवसांपासून दाखल होती. तिला NIV सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं. याव्यतिरिक्त तिच्यावर रेमडेसिवीर आणि प्लाझा थेरपीद्वारे उपचार करण्यात येत होते असे या ट्विटमध्ये लिहिले होते. मात्र त्यानंतर तिला आयसीयू बेड मिळाला होता. १०.५ लाख लोकांनी ट्विटर हा व्हिडिओ पाहिला होता.
https://twitter.com/drmonika_langeh/status/1391062602860482562?s=20
या मुलीमध्ये दृढ इच्छाशक्ती आहे असे डॉक्टर मोनिका यांनी लिहिले होते. त्या महिलेने गाणी ऐकता येतील का असे डॉ. मोनिका यांना विचारले होते. डॉक्टरने शाहरुख आणि आलिया भट्ट यांच्या डियर जिंदगी चित्रपटातील ‘लव यू जिंदगी’ हे गाणं लावलं. व्हिडिओमध्ये त्या महिलेच्या नाकावर ऑक्सिजन मास्क लावला असताना ती आरामात त्या गाण्याच्या तालावर झुलत होती. हा व्हिडिओ शेअर करत डॉ. मोनिका यांनी ‘धडा: कधीही आशा गमावू नका’ असे लिहिले होते. दुर्दैवाने या महिलेचा मृ्त्यू झाला आहे. नेटकऱ्यांनी याविषयी आपलं दुःख व्यक्त या महिलेला श्रद्धांजली वाहिली आहे.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1393102013840248840?s=19