सोलापूर : शहर आणि जिल्ह्यात यापूर्वी लागू झालेला लॉकडाऊन १५ मे पासून पुढेही लागू राहील, परंतु अत्यावश्यक सेवेतील सोलापूर शहरासोबतच जिल्ह्यातील किराणा दुकाने भाजी मंडई तसेच इतर अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. परंतु याठिकाणी गर्दी आढळल्यास १०० टक्के कारवाई होईल, अशी माहिती सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज दिली.
सारे हळहळले! 'ती' आयुष्याची लढाई हरली, 'लव यू जिंदगी' या गाण्यासोबत झाली होती लोकप्रिय
https://t.co/24NbJ4YZQF— Surajya Digital (@SurajyaDigital) May 14, 2021
कोरोना प्रतिबंधक उपाययोजना संदर्भात पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शुक्रवारी बैठक घेतली. नियोजन भवनात झालेल्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आज शहर – जिल्ह्यात रमजान आणि अक्षय तृतीयेमुळे पोलिसांचा कडक बंदोबस्त होता. शहरात मुस्लिम बहुल भागात पोलिस गर्दी होणार नाही, याबाबत दक्ष होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कोरोना कॉलर ट्यूनवरून उच्च न्यायालय भडकलं; म्हणे….हा संदेश 10 वर्षे चालवाल https://t.co/tY29DckEst
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 14, 2021
महाराष्ट्र शासनाने लॉकडाउन लागू केला आहे. १५ मे च्या सकाळी ७ पर्यंत लॉकडाउन संबंधित निबंध लागू आहेत. त्यानंतर पुढेही लागू राहतील. परंतु या दरम्यान अत्यावश्यक सेवांना मुभा राहील. अत्यावश्यक सेवा ठिकाणी लोकांनी अनावश्यक गर्दी करू नयेत. लोकांनी फिजिकल डिस्टन्स पाळावेत. अन्यथा पोलीस विभागाला कारवाईचे आदेश दिले आहेत,असेही पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.
महाराष्ट्रात अलर्ट : सहा जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज #rain #maharashtra #अंदाज #पाऊस #surajyadigital #सुराज्यडिजिटल #ALERT pic.twitter.com/0x85DdhIjG
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 14, 2021